शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

खिचडीसाठी विद्यार्थी झेडपीत धडकले

By admin | Updated: September 29, 2014 23:02 IST

जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थी सुदृढ राहावे, त्यांच्या पोषणाचा प्रश्न मिटावा यासाठी शासनाने शाळेत विद्यार्थ्यांना खिचडी देण्याची योजना सुरु केली आहे. मात्र जिवती तालुक्यातील आंबेझरी येथील

चंद्रपूर : जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थी सुदृढ राहावे, त्यांच्या पोषणाचा प्रश्न मिटावा यासाठी शासनाने शाळेत विद्यार्थ्यांना खिचडी देण्याची योजना सुरु केली आहे. मात्र जिवती तालुक्यातील आंबेझरी येथील विद्यार्थ्यांना मागील दोन महिन्यांपासून नियमित खिचडी मिळत नसल्याची तक्रार घेऊन तेथील चिमूकले विद्यार्थी चक्क जिल्हा परिषदेवर धडकले. एवढेच नाही तर, त्यांनी मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांच्या अभ्यागत कक्षामध्येही प्रवेश घेत न्याय देण्याची मागणी केली. विद्यार्थ्यांच्या या प्रकाराकडे सर्र्वांचे लक्ष लागले होते. जिवती येथून काही अंतरावर असलेल्या आंबेझरी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये अनागोंदी कारभार सुरु आहे. या कारभाराला ग्रामस्थही कंटाळले आहे. विशेष म्हणजे, शाळा व्यवस्थापन समितीची नेमणूकच केली नसल्याचा प्रकार आज मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत उघडकीस आला.येथील शाळेमध्ये दोन महिन्यापूर्वी ज्या महिलांकडे खिचडी शिजविण्याचे कंत्राट होते त्यांनाच पुन्हा खिचडी शिजविण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी विद्यार्र्थ्यांची आहे. या मागणीसाठी विद्यार्र्थी तसेच पालकांनी प्र्रथम मुख्याध्यापकाला निवेदन दिले. मात्र त्यांच्या निवेदनाचा काहीच उपयोग झाला नाही. त्यानंतर ग्र्रामस्थांनी संवर्ग विकास अधिकारी, विस्तार अधिकाऱ्यांना निवेदन दिले. या निवेदनालाही त्यांनी केराची टोपली दाखविली. शाळेत विद्यार्थ्यांना योग्य दर्जाची खिचडी मिळत नसल्याने मागील पंधरा दिवसापासून काही विद्यार्थ्यांनी शाळेत जाणेही सोडून दिले आहे. मुख्याध्यापक तसेच पंचायत समितीस्तरावरील अधिकाऱ्यांच्या धोरणाला कंटाळून शेवटी विद्यार्थ्यांसह पालकांनी जिल्हा परिषदेत धडक दिली.विद्यार्थी जिल्हा परिषदेत आल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. विशेष म्हणजे, निवेदन देण्यापूर्र्वी विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या आवारात झाडाच्या सावलीत बसले. यामुळे जिल्हा परिषदेतील कर्मचारी तसेच पोलिसांनी त्यांची विचारपूस केली. या प्रकारानंतर मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यागत कक्षामध्ये बसण्याची व्यवस्था केली. त्यानंतर ग्रामस्थांचे निवेदन स्वीकारले. यावेळी मागण्या पूर्ण करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. दरम्यान मंगळवारी सकाळी १०.३० वााजता शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक, गटशिक्षणाधिकारी, संवर्ग विकास अधिकारी, सरपंचाची बैठक बोलावून पुढील निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यकार्यपालन अधिकाऱ्यांनी दिले.निवेदन देण्यासाठी विद्यार्थ्यांसह तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दिगांबर ढाले, सरपंच शोभा मडावी, पोलीस पाटील सुर्र्यभान मडावी यांच्यासह मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)