शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
3
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
4
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
5
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
6
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
7
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
8
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
9
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
10
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
11
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
12
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
13
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
15
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
16
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
17
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
18
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
19
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
20
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य

जखमी सिद्धेश्वरीला विद्यार्थ्यांनीच दिला मदतीचा हात

By admin | Updated: April 4, 2015 00:33 IST

खेळण्या बागड्याच तिचं वय, तरीही शाळेत जाण्याची तिची जिद्द. चार वर्षांची होताच, तिने शाळेत जाणे सुरू केले.

मानवतेचा प्रत्यय : पाहता-पाहता गोळा झाला ५० हजारांचा निधीरत्नाकर चटप नांदाफाटाखेळण्या बागड्याच तिचं वय, तरीही शाळेत जाण्याची तिची जिद्द. चार वर्षांची होताच, तिने शाळेत जाणे सुरू केले. अशातच काळाचे घात केला आणि ती सुंदर पहाट तिच्या आयुष्यासाठी काळ ठरली. मात्र तिच्या सोबत शिकणाऱ्या, एकत्र जेवणाचा डबा खाणाऱ्या तिच्या मित्र-मैत्रीणींना आणि शिकविणाऱ्या शिक्षक, संचालक मंडळाने मदतीसाठी पुढाकार घेतला आणि पाहता-पाहता ५० हजार रुपयांचा निधी गोळा झाला.हा सामाजिक दायित्त्वाचा वसा जपला आहे, कोरपना तालुक्यातील नांदाफाटा येथील श्री शिवाजी इंग्लिश हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी. याच शाळेत नर्सरी वर्गात शिकणारी सिद्धेश्वरी राजू देवाळकर (मु.सांगोडा) ही काही दिवसांपूर्वी अंगावर गरम पाणी अंगावर पडल्याने ७० टक्के जळाली. तिला तातडीने उपचारासाठी वणी (जि.यवतमाळ) येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच, येथील प्राचार्य अ‍ॅलेक्झाड्रिना डिसुजा आणि शिक्षकांनी वणी येथे जावून सिद्धेश्वरीची भेट घेतली. यावेळी तिच्या जगण्याची आशा कुणालाच नव्हती. मात्र डॉक्टरांच्या अथक परिश्रमाने तिच्या प्रकृतीत सुधार होऊ लागला. मात्र रुग्णालयाचा खर्च तिच्या पालकांना न पेलविणारा होता. दररोज पाच ते सहा हजार रुपये औषधांसाठी खर्च होत असल्याने घरची पुंजी संपली. शेती व्यवसायावर उदरनिर्वाह करणाऱ्या या कुटुंबाला यावर्षी उत्पन्न झाले नाही. त्यामुळे सिद्धेश्वरीच्या उपचाराचा पूर्ण भार आईवर आला. शिक्षक भेटीसाठी आल्यानंतर आईचे डोळे पाणावले. आर्थिक अडचणीमुळे मुलीवर उपचार होऊ शकणार नाही, ही विवंचना आईने शिक्षकांजवळ सांगितली. शाळेत उत्तम गुण मिळवून आपल्या बुद्धीमत्तेची सर्वांना भुरळ घालणाऱ्या सिद्धेश्वरी जळाल्याने जखमी झाल्याची माहिती दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांनाही कळली. विद्यार्थीही मदतीसाठी पुढे सरसावले. दुसऱ्या दिवशीपासून ‘थेंबे थेंबे तळे साचे’ या उक्तीप्रमाणे कुणी १०० कुणी ५० तर कुणी २० ते ३० रुपये मदत दिली. यातून तब्बल ५० हजार रुपये गाळा झाले. विद्यार्थ्यांच्या या आर्थिक मदतीमुळे सिद्धेश्वरीच्या पुढील उपचाकरासाठी मोठी मदत होणार आहे. (वार्ताहर)