गोंडपिपरी: तालुक्यातील प्राथमिक शाळेच्या दोन शिक्षकांकडून सध्या माध्यमिक शाळेत शिक्षण घेणाऱ्या माजी विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण केल्यानंतर सदर विद्यार्थिनीला गर्भधारणा झाल्याचा विषय संपूर्ण तालुक्यात चर्चीले जात आहे. मोठ्या अर्थकारणातून सदर प्रकरणावर पांघरुण घातल्याची माहिती हाती आली आहे. याप्रकरणात अन्य शिक्षकांकडूनदेखील मौन पाळल्या जात आहे.समाजात माता-पित्यानंतर गुरुचे स्थान हे आदरनीय मानले जाते. शिक्षणाच्या पवित्र्य क्षेत्रात कार्य करणाऱ्या शिक्षकाकडून केल्या जाणाऱ्या ज्ञानदानाद्वारे मुलांचे भविष्य उज्वल होते. मात्र सध्यस्थितीत गुरुस्थानाला काळीमा फासणाऱ्या काही शिक्षकांच्या गैर वर्तणुकीमुळे या क्षेत्राची प्रतिमा डागाळली जात आहे. असाच एक प्रकार तालुक्यात घडल्याची आता कुजबुज सुरु झाली आहे.तालुक्यातील दोन शिक्षकांनी त्यांच्याच हातून प्राथमिक शिक्षणाचे धडे घेणाऱ्या व सध्या माध्यमिक शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण करण्यात आले. त्यातून त्या अल्पवयीन मुलीस गर्भधारणा झाल्याने बदनामी व मोठ्या कारवाईच्या धाकापोटी मोठ्या अर्थकारणातून प्रकरण दडपल्याचा प्रकार घडल्याची तालुक्यात खंमग चर्चाा आहे.सदर प्रकार घडल्यानंतर ‘त्या’ शिक्षकांनी गावातील काही नागरिकांच्या मदतीने युवतीला पोलीस तक्रार देण्यापासून वंचित ठेवल्याचेही सांगण्यात येते. अत्याचारग्रस्त विद्यार्थिनीने व तिच्या पालकांनी यासंबंधी बीट अंमलदाराकडे तक्रार दिल्यानंतर तेथील जमादाराने मध्यस्थी करित मोठ्या अर्थकारणातून तक्रार न होऊ दिल्याची चर्चा आहे.सध्या अत्याचाराच्या प्रकारणावर शासनाचे सर्व विभाग नजर ठेऊन आहेत. गोंडपिपरी तालुक्यात घडलेल्या या प्रकरणासंबंधी अधिक माहिती घेतली असता शिक्षक वर्तुळात याबाबत मौन पाळले जात असून कुणीही या बाबत माहितीही देण्यास तयार नाही. (तालुका प्रतिनिधी)
शिक्षकांकडून विद्यार्थिनीचे शोषण
By admin | Updated: February 13, 2015 01:34 IST