सिंदेवाही : तालुक्यात मागील काही वर्षांपासून अनेक विकास कामे शासनाच्या आणि स्थानिक नेत्याच्या दूषित राजकारणामुळे अडकून आहेत. त्याला चालना देण्यासाठी सिंदेवाहीमध्ये व्यापारी मंंडळाच्या संघर्ष समितीची स्थापना नुकतीच करण्यात आली. ही समिती सिंदेवाही येथे कृषी विद्यापीठ व नगरपालिका या दोन मुख्य प्रश्नांवर लढा देणार आहे.या समितीने दोन दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सभागृहात आमदार तथा विधानसभेचे उपगटनेते विजय वडेट्टीवार व सिंंदेवाहीचे ज्येष्ठ नागरिक माजी सरपंच, माजी पंंचायत समिती सभापती, पत्रकार यांच्या समश्र परिसंवाद घडवून आणला. प्रत्येक व्यक्तीने आपली भूमिका नागरिकांसमोर मांडली. सिंदेवाही नगरपंचायत, कृषी विद्यापीठ का होत नाही किंवा काय त्रुटी आहेत, यावर विचारविनमय करण्यात आले. शेवटी आमदार वडेट्टीवार यांना त्रुटी, प्रश्नांचे उत्तर मागितले. आमदार यांनी शासन दरबारी नगरपंचायतीचा विषय आहे. स्थानिक काही नागरिकांनी नगरपंचायतबद्दल आक्षेप नोंदविल्यामुळे हा विषय न्यायालयात सुरू आहे. नागरिकांनी आक्षेप मागे घेतल्यास आपण स्वत: संघर्ष समितीच्या सदस्यासोबत मुख्यमंत्र्यासमक्ष येणाऱ्या आठ दिवसात नगरपंचायतचा दर्जा सिंदेवाहीला मिळवून देऊ तसेच कृषी विद्यापीठसाठी संघर्ष समितीने संघर्ष करावा. तालुक्यात सर्व सुविधा असून विदर्भात सिंदेवाहीत कृषी विद्यापीठ व्हावे, असे आपण मुख्यमंत्र्यासोबत चर्चे दरम्यान सांगितले, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. (शहर प्रतिनिधी)
सिंदेवाहीच्या समस्यांसाठी आता लढणार संघर्ष समिती
By admin | Updated: September 9, 2015 00:58 IST