शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलनाचा फटका : अल्ट्राटेक सिमेंट प्लांट अनिश्चित काळासाठी बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 12:57 IST

Chandrapur : आंदोलन, प्रवेशबंदी व सुरक्षेच्या कारणावरून व्यवस्थापनाचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना (जि. चंद्रपूर) : कोरपना तालुक्यातील आवारपूर येथील अल्ट्राटेक सिमेंट कंपनीने अनिश्चित काळासाठी उत्पादन बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. बुधवार, २५ जून रोजी दुपारी ४ वाजता घेतलेल्या या निर्णयाने कामगारांमध्ये भीती पसरली आहे. कंपनी प्रशासनाच्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली प्रवेशबंदी, ठिय्या आंदोलन आणि अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न या निर्णयामागील प्रमुख कारणे आहेत.

राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या तीन दिवसांपासून कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला उत्तर देताना व्यवस्थापनाने संपूर्ण प्लांट बंद करण्याचा धक्कादायक निर्णय घेतला. या निर्णयानंतर प्लांटमधील सर्व अधिकारी, स्थायी आणि कंत्राटी कामगारांना तातडीने बाहेर काढण्यात आले. रॉ मिल, दोन किलन व चारही सिमेंट मिल्स बंद करण्यात आल्या. आता केवळ पॉवर प्लांट कार्यरत आहे.

कारण काय ?अवास्तव मागण्या व आंदोलनस्थळावरून जाहीररीत्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना सतत देण्यात येणाऱ्या धमक्यांमुळे अधिकारी धास्तावलेले आहेत. काही कामगार आंदोलनात सहभागी झाले तर काही कामगार कामावर येत असल्याने प्लांटमधील वातावरण अस्थिर झाले आहे. म्हणूनच आम्ही प्लांट अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे नाव न छापण्याच्या अटीवर कंपनीतील एका अधिकाऱ्याने 'लोकमत'शी बोलताना सांगितले.

हजारो कुटुंबांवर आर्थिक संकटअचानक या निर्णयामुळे हजारो कुटुंबांवर उदरनिर्वाहाचे संकट निर्माण झाले आहे. औद्योगिक शांततेला तडा जाऊन स्थानिक रोजगार धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मध्यस्थीची मागणीस्थानिक नागरिक, कामगार संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासन व लोकप्रतिनिधींनी त्वरित मध्यस्थी करावी, अशी मागणी केली आहे. आंदोलन, औद्योगिक हित आणि स्थानिक रोजगार यामध्ये समतोल साधणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.

पालगाव रस्त्याचा प्रश्न ठरतोय वादग्रस्त केंद्रबिंदूया आंदोलनामागील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पालगाव रस्ता, जो अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे स्थानिक जनता आणि कामगारांमध्ये नाराजी होती. त्या पार्श्वभूमीवर आंदोलनाला वेग मिळाला आहे.

औद्योगिक वातावरणावर परिणामाची शक्यताऔद्योगिक शांतता आणि स्थानिक हित यामध्ये समन्वय साधण्याची ही वेळ आहे. या प्रश्नावर योग्य तोडगा निघाला नाही, तर जिल्ह्यातील औद्योगिक वातावरण आणि रोजगार यावर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

"पालगावचा रस्ता हा अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्न आहे. कामगारांची पिळवणूक आणि स्थानिक जनतेच्या समस्या लक्षात घेऊन आम्ही आवाज उठवला आहे. आमच्या मागण्या अत्यंत शुल्लक असून, कंपनीने त्या तातडीने मान्य कराव्यात. आमदार या नात्याने स्थानिक जनतेच्या हक्कांसाठी लढणे हे माझे कर्तव्य आहे."- देवराव भोंगळे, आमदार, राजुरा विधानसभा

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर