शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिक बंदीची शहरात कठोर अंमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 01:14 IST

शासनाने प्लॉस्टिक व थर्माकोलवर निर्मिती व विक्रीवरही बंदी आणली. यासोबतच कठोर दंड ठोठावण्यात तरतूद केली. या कायद्याची पायमल्ली होऊ नये, यासाठी नगर परिषदच्या वतीने कठोर अंमलबजावणी केली जात आहे.

ठळक मुद्देनगर परिषदेची कारवाई : प्लास्टिकचा वापर न करण्याबाबत व्यावसायिकांकडून घेतले शपथपत्र

लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : शासनाने प्लॉस्टिक व थर्माकोलवर निर्मिती व विक्रीवरही बंदी आणली. यासोबतच कठोर दंड ठोठावण्यात तरतूद केली. या कायद्याची पायमल्ली होऊ नये, यासाठी नगर परिषदच्या वतीने कठोर अंमलबजावणी केली जात आहे.प्लॉस्टिकचा वापर करताना सापडल्यास शिक्षा होते. पहिला गुन्हा करणाऱ्याला ५ हजार, दुसरा गुन्हा गेल्यास १० हजार व तिसरा गुन्हा केल्यास २५ हजाराचा दंड तसेच तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात येणार आहे. व्यावसायिकांकडून याबाबतचे शपथपत्र लिहून घेतले जाणार आहे. शासनाच्या या कायद्याला अनुसरून भद्रावती नगरपालिकेने प्लॉस्टिक व थर्माकोल बंदीची मोहीम हाती घेण्यात आली. येत्या १६ एप्रिलपासून प्लॉस्टिक वापरावर बंदी घालण्यात आली आहे. प्लॉस्टिक बंदीबाबत प्रबोधन करण्यासाठी न.प. च्या सभागृहात एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेला शहरातील विविध क्षेत्रातील नागरिकांना बोलाविण्यात आले होते. होते. याप्रसंगी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, सभापती सुधीर सातपुते व मुख्याधिकारी विनोद जाधव तसेच सर्व नगरसेवक उपस्थित होते. प्लॉस्टिकमुळे होणाऱ्या दुष्परिणाम याबाबत चर्चा करण्यात आली. व्यावसायिकांनी यावेळी समस्या मांडल्या. प्लॉस्टिक बंदीवर अन्य पर्याय काय, याबाबतही विचारणा त्यांनी केली असता कापडाच्या पिशव्या मोठ्या प्रमाणात वापरावे, अशी माहिती नगर परिषदच्या वतीने देण्यात आली. नगरसेवकांपासून तर अन्य ३५ प्रकारच्या अधिकाऱ्यांमार्फत प्लॉस्टिकबाबत कारवाई करण्याचे अधिकार शासनाने दिले आहे. भद्रावती न.प. द्वारे या कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने सहा पथके तयार करण्यात आहेत. एका पथकात चार कर्मचाऱ्यांचा सहभाग राहणार असून त्यांच्यासोबत पोलिसांची उपस्थिती राहील. या मोहिमेला शहरातील सर्व व्यापारी व दुकानदारांनी सहकार्य केल्यास प्लॉस्टिक मुक्तीचा संकल्प कृतीत उतरणार आहे.कागदी कपातून घेतला चहाकार्यशाळेत उपस्थित असणाऱ्या सर्व नागरिकांना यावेळी पहिल्यांदाच न.प. द्वारे कागदी कपातून चहा देण्यात आला. प्लास्टिकच्या कपाऐवजी कागदी कप वापरण्यात आल्याने चर्चेचा विषय ठरला होता. यापुढे बॅनरलाही नवीन पर्याय दिला जाणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.