शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

समता व बंधुतेचा आवाज बुलंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2016 00:43 IST

भारतात बहुराष्ट्रीय कंपन्यांचे प्राबल्य वाढत आहे. फॅसिस्ट शक्ती कायदे बदलण्याचे छुपे मनसुबे रचून भारतीय संविधानाला हादरे देऊ लागले आहेत.

अभिजित वैद्य : ‘वाढती असहिष्णुता व सामाजिक भाईचारा’वर व्याख्यानचिमूर : भारतात बहुराष्ट्रीय कंपन्यांचे प्राबल्य वाढत आहे. फॅसिस्ट शक्ती कायदे बदलण्याचे छुपे मनसुबे रचून भारतीय संविधानाला हादरे देऊ लागले आहेत. एकूणच देशात मनुस्मृतीचे राज्य आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. याकरिता समता व बंधुतेचा विचार बुलंद करावा, असे आवाहन राष्ट्रसेवा दलाचे कार्यकारी विश्वस्त डॉ. अभिजित वैद्य यांनी चिमूर येथे केले.समाजवादी नेते भाई रहेमतुल्ला यांच्या २१ व्या स्मृतिदिनानिमित्त ‘वाढती असहिष्णुता व सामाजिक भाईचारा’ विषयावर आयोजित व्याख्यानमालेमध्ये ते बोलत होते.यावेळी डॉ. वैद्य यांच्या हस्ते स्व. भाई रहेमतुल्ला यांच्या धर्मपत्नी साबेरा बेगम यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बालाजी पाटील डाहुले उपस्थित होते. प्रमुख पाहुणे प्रा. नुतन माळवी, कर्नल चंद्रशेखर रानडे, प्रा. युनूस शेख आदी उपस्थित होते. डॉ. वैद्य म्हणाले की, सध्या राजकारणात व समाजात फॅसिझम वाढत चालला आहे. हिंदू राष्ट्राची स्थापना करण्याची वारंवार घोषणा देऊन काही धर्मांध लोक समाजात अशांतता निर्माण करू पाहत आहे. त्याच वेळी गरिबांसाठी शिक्षण घेणे महाग झाले आहे. समाजात विषमतेची दरी वाढत चालली आहे, असा आरोपही त्यांनी केला.याप्रसंगी प्रा. नुतन माळवी म्हणाल्या की, भारतीय संविधानाने स्त्री-पुरुष समता दिली आहे. मात्र सध्या सत्तेत असणाऱ्या सरकारला मनुस्मृती व गीता ग्रंथ पुढे आणायचा आहे. हे दोन्ही ग्रंथ विषमता निर्माण करणारे असल्यामुळे या विरोधात संघर्ष करणे आवश्यक आहे.प्रारंभी वसंतराव कडू गुरुजी व संचाने मंगेश पाडगांवकर यांचे गीत व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची वंदना आणि सिंदेवाही येथील कमल बारसागडे व त्यांच्या संचाने स्वागतगीत सादर केले. पाहुण्यांचे स्वागत तालुका अध्यक्ष माधुरी वीर यांनी केले. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद इखलाकभाई कुरेशी यांनी केले. संचालन मुस्तकीम पठाण गुरुजी यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी भाई रहेमतुल्ला यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. (प्रतिनिधी)