शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

महानगरपालिकेची आर्थिक बाजू भक्कम करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 23:27 IST

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : २०१८-१९ च्या वित्तीय वर्षाच्या अंदाजपत्रकासाठी मनपाच्या सर्व विभागांनी आपल्या उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे, वित्तीय शिस्त अंगी बाळगावी, विवादित प्रकरणे निकाली काढण्याच्या दृष्टीने अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे, असे निर्देश स्थायी समिती सभापती राहुल पावडे यांनी दिले.महानगरपालिकेचे उत्पन्न हे प्रामुख्याने आकारल्या जाणाऱ्यां करांवर व काही प्रमाणात राज्य शासनाद्वारे ...

ठळक मुद्देमनपात बजेट चर्चा : राहुल पावडे यांचे आवाहन

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : २०१८-१९ च्या वित्तीय वर्षाच्या अंदाजपत्रकासाठी मनपाच्या सर्व विभागांनी आपल्या उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे, वित्तीय शिस्त अंगी बाळगावी, विवादित प्रकरणे निकाली काढण्याच्या दृष्टीने अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे, असे निर्देश स्थायी समिती सभापती राहुल पावडे यांनी दिले.महानगरपालिकेचे उत्पन्न हे प्रामुख्याने आकारल्या जाणाऱ्यां करांवर व काही प्रमाणात राज्य शासनाद्वारे दिल्या जाणाºया अनुदानावर अवलंबून असते. शहरातील नागरिकांना दिल्या जाणाºया आरोग्य, शिक्षण, पाणी, स्वच्छता सेवा मनपाद्वारे दिल्या जातात. त्यातून येणारे अंदाजित उत्पन्न व होणारा अंदाजित खर्च याचा ताळमेळ घालून अंदाजपत्रक मांडले जाते. यातील खर्चाची बाजू दरवर्षी वाढणारी असते. अशा वेळेस संभाव्य खर्चाचा अंदाज घेवून उत्पन्नाची मांडणी करणे आवश्यक ठरते, असे ते म्हणाले.चंद्रपूर महानगरपालिकेकडे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचे विशेष लक्ष असते. शहरातील विकास कामाप्रती पालकमंत्री नेहमीच सजग असतात. कामे शीघ्र गतीने व दिलेल्या मुदतीत पूर्ण व्हावी, याकडे त्यांचा विशेष कटाक्ष असतो. शहरातील सौंदर्यीकरणाच्या दृष्टीने काही विकास कामे आखून दिलेली आहेत. त्यासाठी विशेष निधी उपलब्ध करून दिलेला आहे. ज्यात धांडे रुग्णालजवळील मोकळ्या जागेचा विकास, वाहतूक नियंत्रण कार्यालय रस्ता, नागपूर रोडवरील पथदिवे व चौक सौंदर्यीकरण, कोणेरी स्टेडियम, बाबूपेठ स्टेडियम, रयतवारी प्रभागात काँक्रीटचा रस्ता इत्यादी विकासकामांचा सहभाग आहे, असे सभापती पावडे यांनी सांगितले.याप्रसंगी उपमहापौर अनिल फुलझेले, अतिरीक्त आयुक्त भालचंद्र बेहरे, उपायुक्त विजय देवळीकर, सहायक आयुक्त सचिन पाटील, धनंजय सरनाईक, शहर अभियंता बारई व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.निधी परत जाणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देशशालेय शिष्यवृत्ती योजना, पालकमंत्री शालेय गणवेश योजना, पालकमंत्री ई-लर्निंग योजना, पालकमंत्री शालेय सब बढे, सब पढे योजना, पालकमंत्री पेयजल योजना अंमलात आणल्या का, आणल्या तर त्याची प्रगती किती तसेच पालकमंत्री विविध योजनेतील निधी परत जाणार नाही, याची खात्री करण्याचे निर्देश सभापती पावडे यांनी यावेळी दिले. या सर्व बाबींचा आढावा घेत मुख्य लेखा अधिकारी यांच्याकडून उपलब्ध निधीबाबत माहिती जाणून घेतली व कर विभागाला विवादस्पद प्रकरणे लवकर सोडविण्याचे सूचना दिल्या.