शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

अंधारलेल्या आयुष्यात ‘बुद्धी’चे ‘बळ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 23:58 IST

जगात पाऊल ठेवले आणि संपूर्ण जगच नजरेआड झाले. जन्मताच मिळालेले अंधत्व नियतीने तिच्याशी खेळलेली क्रूर थट्टाच होती. तरीही या थट्टेला हसतमुखाने स्वीकारत तिने अंधत्व झुगारून बुध्दीचेच डोळे केले.

ठळक मुद्देविक्रमावर विक्रम : दिव्यांग इंदिराची गगनभरारी

रवी जवळे ।आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : जगात पाऊल ठेवले आणि संपूर्ण जगच नजरेआड झाले. जन्मताच मिळालेले अंधत्व नियतीने तिच्याशी खेळलेली क्रूर थट्टाच होती. तरीही या थट्टेला हसतमुखाने स्वीकारत तिने अंधत्व झुगारून बुध्दीचेच डोळे केले. बुध्दी आणि त्याचे बळ एकवटून तिने बुध्दीबळात यशोशिखर गाठून स्वत:सोबत आपल्या देशाचेही नाव अजरामर केले. इंदिरा गिलबिले असे या तरुणीचे नाव. वेदनतून जिद्द आणि सामर्थ्याच्या बळावर आनंदाकडे घेऊन जाणारा इंदिराचा हा संघर्षप्रवास आज इतरांसाठीही प्रेरणादायी ठरला आहे.इंदिरा गिलबिले ही मूळची गडचांदूर येथील रहिवासी. तिचे वडील शंकरराव गिलबिले हे मोलमजुरी करतात. २७ मे १९८८ रोजी इंदिराचा जन्म झाला. तिचा हा जन्मोत्सव तिच्या कुटुंबीयांसाठी दु:खाचा उत्सव ठरला. इंदिरा जन्मताच दोन्ही डोळ्यांनी अंध होती. एक तर मुलगी आणि त्यातही ती अंध, त्यामुळे हलाकीच्या परिस्थितीत जगणारे गिलबिले कुटुंब हादरून गेले.नियतीने एका हाताने तिचे डोळे हिरावून घेतले; मात्र दुसºया हाताने तिला चाणाक्ष्य बुध्दी बहाल केली. या बुध्दीच्या बळावरच तिने बुध्दीबळ या खेळाला जवळ केले. पुढे याच खेळाने तिला देशाच्या जवळ केले. इंदिराला बुध्दीबळाची बालपणापासूनच आवड होती. घोडपेठ येथील प्रेरणा अंध विद्यालय आणि कर्मवीर विद्यालयातून तिने क्रीडा कौशल्याचे सामर्थ्य आत्मसात केले. बुध्दीबळ स्पर्धेत लहानमोठ्या कामगिºया केल्यानंतर इंदिराने थेट आंतरराष्टÑीय स्पर्धेपर्यंत मजल मारली. २००५ मध्ये अथेन्समध्ये जागतिक अंध महिला बुद्धीबळ स्पर्धेत इंदिरा गिलगिले हिने प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करीत जिद्द आणि चिकाटी असली की काहीही अशक्य नाही, हे सर्व विश्वाला दाखवून दिले.इंदिराला घडवायचीय नवी पिढीइंदिरा गिलबिलेने केवळ बुध्दीबळच नाही तर शिक्षणातही भरारी घेतली आहे. एम.ए. बीएड्. झाल्यानंतर सध्या ती दिल्ली येथे एका इस्पितळात नोकरी करीत आहे. आजची पिढी हुशार आहे. मात्र व्यसनाच्याही आहारी जात आहे. शिक्षिका होऊन देशाच्या नव्या पिढीला शिक्षित आणि संस्कारित करण्याचा मानस असल्याचे इंदिराने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.