चिमूर, भिसी कॉर्नर मेन रोड, वॉर्ड न १, टीचर कॉलनीमागील पथदिवे पाच दिवसांपासून बंद असून, रात्रीच्यासुमारास मोठ्या प्रमाणात अंधार पसरलेला असतो. हा मार्ग भिसीकडे जाणारा मार्ग तसेच चिमूरकडे जाणारा मुख्य मार्ग असल्यामुळे रात्रीच्यासुमारास मोठ्या प्रमाणात टिप्पर चालत असून, टू-व्हिलर वाहनधारक तसेच पायदळ चालणारे नागरिकही असतात. अंधारामुळे अपघात होण्याची शक्यता वर्तवली आहे, तसेच जवळच प्राथमिक आरोग्य केंद्र असल्यामुळे पाच दिवसांपासून बंद असलेले पथदिवे संबंधित विभागाने लक्ष देऊन सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान, चार दिवसांपूर्वी आलेल्या वादळामुळे कुठेतरी विद्युत तार चिपकली आहे. यासंदर्भात महावितरण कंपनीची मदत मागितली आहे. त्यांच्यामार्फत लवकरच विद्युत पुरवठा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच साईश वारजूकर यांनी दिली.
शंकरपूर ग्रामपंचायतअंतर्गत पथदिवे बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:26 IST