शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

जिल्ह्यात वादळी पावसाचा तडाखा

By admin | Updated: May 3, 2016 01:11 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह नागरिकांना यावर्षी निसर्गाने चांगलेच त्रस्त करून सोडले आहे. खरीप हंगामापासूनच

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह नागरिकांना यावर्षी निसर्गाने चांगलेच त्रस्त करून सोडले आहे. खरीप हंगामापासूनच निसर्ग नागरिकांवर अवकृपा करीत आहे. आता अकाली पावसाने वैताग आणला आहे. वारंवार होणाऱ्या अकाली पाऊस व वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचेही मोठे नुकसान होत आहे. मागील आठवड्यात दोन दिवस चक्रीवादळाचा तडाखा बसला. आज सोमवारी पुन्हा जिल्ह्यात वादळी पाऊस येऊन नागरिकांचे नुकसान झाले.खरीप हंगामापासूनच निसर्ग जिल्ह्यावर कोपला आहे, असेच दिसून येते. खरीप हंगामात पाऊस पडायला पाहिजे. मात्र याच कालावधीत पावसाने दडी मारली. सरासरीच्या तुलनेत संपूर्ण पावसाळ्यात अत्यंत कमी पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. पाऊसच नसल्याने रबी हंगाम करायचा की नाही, या विवंचनेत शेतकरी होते. तरीही अनेक शेतकऱ्यांनी रबीची पेरणी केली. मात्र सिंचनाअभावी यातही अनेकांचे नुकसान झाले. ज्यांनी कशीबशी शेती पिकविली, त्यांचे पीक हाती येत असताना अकाली पावसाने झोडपले. त्यामुळे गहू, चना व इतर रबी पिके अकाली पावसाच्या तडाख्यात खराब झाली. खरीपात आधीच डोक्यावर कर्ज, रबीत पुन्हा नुकसान, यामुळे शेतकरी चांगलाच खचला. पुढील वर्षीही त्यांचे हे नुकसान भरून निघेल की नाही, याची शाश्वती नाही. खरीप, रबीवर कोपलेला निसर्ग आताही अवकृपाच दाखवित आहे. भर उन्हाळ्यात अकाली पावसाचे थैमान सुरू आहे. केवळ पाऊसच नाही तर गारपीट, वादळी वारा, चक्रीवादळ याचेही तांडव सुरू असल्याने नागरिकांचे अतोनात नुकसान होत आहे. मागील आठवड्यात बुधवारी रात्री जिल्ह्यात अनेक ठिकाणी चक्रीवादळासह पावसाने हजेरी लावली. तर गुरूवारीही चंद्रपूर शहरासह अनेक गावांना चक्रीवादळाचा तडाखा बसला. गुरूवारी रात्रीच्या सुमारास अनेक ठिकाणी चक्रीवादळासह पाऊस झाला. त्यामुळे अनेकांच्या घरांचे छप्परे उडाली.तर वीज कंपनीच्या खांबावर झाडे पडल्याने अनेक ठिकाणी विद्युत तारा तुटल्या. त्यामुळे चंद्रपूर शहराचा वीज पुरवठा सुमारे एक तास खंडीत होता. तर अनेक गावातील वीज रात्रभर गूल होती. जिवती, राजुरा तालुक्यातील वीज ४८ तासांपर्यंत पूर्ववत होऊ शकलीनाही.राजुरा तालुुक्यातील गोवरी येथे गुरुवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास अचानक आलेल्या चक्रीवादळाने गावातील बहुतांश घरांचे छप्पर उडून नुकसान झाले होते. अनेक मोठमोठी झाडे उन्मळून पडली. विजेचे खांब तुटल्याने राजुरा-गोवरी मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. गोवरी येथील बंडू बोरकुटे, भास्कर गंधमवार, शंकर गंधमवार, भाऊराव जुनघरी यांचा घरांची छप्परे उडाली तर प्रभाकर जुनघरी, डॉ. वासुदेव लोहे, पैकन बल्की, नवनाथ पाचभाई, रुपेश पाचभाई यांच्या गोठ्यातील टिनाचे पत्रे वाऱ्याच्या जबरदस्त तडाख्यात उडून गेली. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की घराच्या छप्परांचा सांगाडाच ५०० फुटापर्यंत दूर फेकल्या गेला. यात अनेकांच्या घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. शंकर गंधमवार यांचा घरातील सर्व सदस्य जेवण करण्याच्या तयारीत असतानाच अचानक आलेल्या वादळाने त्यांच्या घराचे संपूर्ण छप्पर उडवून नेले. काही कळायचा क्षणार्धात सर्व कुटुंब आभाळाखाली आले. जीवीत हाणी झाली नसली तरी जिल्ह्यात वादळी पावसामुळे मोठे नुकसान झाले.येन्सा परिसरालाही बुधवारी सायंकाळच्या सुमारास चक्रीवादळाचा तडाखा बसला होता. आता पुन्हा आज सोमवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास चंद्रपूरसह भद्रावती, वरोरा, बल्लारपूर, राजुरा यासह अनेक तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरूवात झाली. अनेक भागात रात्री ८ वाजेपर्यंत पाऊस सुरूच होता. त्यामुळे नेमके किती नुकसान झाले ते कळू शकले नाही. फिडर नादुरुस्त झाल्याने वीज पुरवठा खंडितचंद्रपुरात प्रचंड वादळ असल्याने वीज पुरवठा खंडित झाला. अचानक आलेल्या वादळी पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. वादळामुळे दुकानांसमोर फलक उडाले. काही दुकानांचे नावफलकही तुटून खाली पडले. सायंकाळच्या सुमारास येथील आझाद बागेत आलेल्या नागरिकांची एकच तारांबळ उडाली. विजांचा कडकडाट असल्याने कुणीही झाडाचा आधार घेतला नाही. त्यामुळे अंधारातच बागेतील लोकांना बाहेर पडावे लागले. फुटपाथवरील दुकानदारांनाही आवरासावर करायला सवड मिळाली नाही.