शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

गोंडवानाच्या विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 23:47 IST

गोंडवाना विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांकडून पदवीच्या द्वितीय व तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी विद्यापीठाने ठरविलेल्या शिक्षण शुल्का ऐवजी अधिकचे शुल्क आकारण्यात येत आहे.

ठळक मुद्देअभाविपची मागणी : शिष्टमंडळाचे कुलगुरूंना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गोंडवाना विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांकडून पदवीच्या द्वितीय व तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी विद्यापीठाने ठरविलेल्या शिक्षण शुल्का ऐवजी अधिकचे शुल्क आकारण्यात येत आहे. याची दखल घेत चंद्रपूर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे विदर्भ प्रांत सहमंत्री रघुवीर अहीर यांच्या नेतृत्वात गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नामदेव कल्याणकर यांना निवेदन देऊन विद्यार्थ्यांची लूट थांबविण्याची मागणी केली आहे.अभाविपने निवेदनातून शिक्षण शुल्क कमी करून ज्या विद्यार्थ्यांकडून हे शुल्क आकारण्यात आले, अशा विद्यार्थ्यांना त्यांचे शुल्क परत करण्यासाठी विद्यापीठातर्फे संबंधित विद्यालयांना लेखी सूचना द्याव्यात, विद्यार्थ्यांवर होत असलेला हा अन्याय अभाविप सहन करणार नाही, अशी भुमिका यावेळी रघुवीर अहीर व अभाविप शिष्टमंडळाने कुलगुरूसमोर मांडली. यावेळी कुलगुरूंनी अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणाºया सर्व महाविद्यालयांना लेखी स्वरूपात निर्देश देण्यात येईल, अशी ग्वाही दिली.विद्यापीठाने परीक्षा शुल्क ठरवून दिली असली तरी अनेक महाविद्यालयाची मुजोरी सुरू आहे. त्यामुळे अनेकदा जादा शुल्क मोजावे लागत असून वारंवार तक्रार करूनही विद्यापीठ प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळेच विद्यार्थ्यांना आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत असून यापुढे असे प्रकार घडल्यास अभाविपतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी सहमंत्री रघुवीर अहीर यांनी कुलगुरूंना निवेदनातून दिला.या शिष्टमंडळात विभाग संघटन मंत्री सौरभ कावळे, गोंडवाना विद्यापीठ प्रमुख शुभम दयालवार, जिल्हा संघटन मंत्री तेजस मोहतूरे, गडचिरोली जिल्हा संयोजक हर्षल गेडाम, नगर सहमंत्री गौरव होकम, यश बांगडे, स्रेहीत लांजेवार, मनिष पिपरे, अंकुश आखरे, कृणाल पाटील, मानवी आक्केवार, वैभव देरकर, अविनाश बहरे, प्रवीण गिलबिले, निखील ठोकळ यांच्यासह संघटनेच्या बहुसंख्य पदाधिकाºयांची उपस्थिती होती.

टॅग्स :universityविद्यापीठ