लोकमत न्यूज नेटवर्कसिंदेवाही : महसूल विभागाने दोन महिन्यांपूर्वी अवैध रेती वाहतूक करणाऱ्या चार ट्रक ताब्यात घेतले होते. दंडही आकारण्यात आला होता. मात्र, दंड न भरता तहसिल कार्यालयाच्या आवारात ठेवण्यात आलेला टॅक्ट्रर मालकानेच चोरून नेल्याचे रविवारी उघडकीस आल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी ट्रक्टमालक विवेक सुभाष हिंगे रा. अंतरगाव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चार ट्रॅक्टरवर लाखो रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. मात्र, असल्याने ट्रॅक्टर मालक दंड भरू न शकल्याने मागील दोन महिन्यापासून ट्रॅक्टर विभागात जमा होते. रविवारी रात्री ट्रॅक्टर चोरीला गेल्याची माहिती झाल्याने प्रभारी तहसीलदार अलोणे यांना मिळाली. त्यामुळे पोलिसात तक्रार दाखल केली. सोमवारला रात्री उशिरापर्यंत माहित झाले की ट्रॅक्टर मालक विवेक सुभाष हिंगे रा. अंतरगाव यांनी ट्रॅक्टर तहसील कार्यालय परिसरातून चोरून नेला. पोलिसांनी अंतरगावला जावून रात्री १० वाजता आरोपी हिंगे याच्याविरुद्ध भांदवी ३७९ अन्वये गुन्हा दाखन्ल करून अटक केली.हा ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करण्यात आला आहे. विशेष असे की, रविवारी रात्री हा ट्रॅक्टर तहसील कार्यालयाच्या परिसरातून चोरून नेताना चौकीदार कुठे गेले होते, असा प्रश्न विचारला जात आहे. आरोपी हिंगे याने महसूल विभागाचा दंड भरला नाही. दंडाची काही रक्कम भरून ट्रॅक्टर सोडविण्याची सवलत देण्यात आली होती. मात्र, त्याकडे कानाडोळा करून जप्तीचा ट्रॅक्टर चोरून नेल्याने तालुक्यात चर्चेचा विषय झाला आहे. याबाबत महसूल विभागाकडून चौकशी केली जात आहे.
जप्तीचा ट्रॅक्टर चोरीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 01:44 IST
महसूल विभागाने दोन महिन्यांपूर्वी अवैध रेती वाहतूक करणाऱ्या चार ट्रक ताब्यात घेतले होते. दंडही आकारण्यात आला होता. मात्र, दंड न भरता तहसिल कार्यालयाच्या आवारात ठेवण्यात आलेला टॅक्ट्रर मालकानेच चोरून नेल्याचे रविवारी उघडकीस आल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.
जप्तीचा ट्रॅक्टर चोरीला
ठळक मुद्देट्रॅक्टर मालकालाअटक : भरला नाही दंड