शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

तलावांची स्थिती चिंताजनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 22:59 IST

मामा तलावांना शेतकऱ्यांचे सुरक्षित सिंचन समजले जाते. मात्र हेच सुरक्षित सिंचन आता धोक्यात आले आहे. यावर्षी अत्यल्प पाऊस पडल्यामुळे जलाशयात पाणी साठू शकले नाही. चंद्रपूर जिल्ह्यात एकूण ९७ मामा तलाव आहेत. मात्र या तलावातील जलसाठ्याची स्थिती आतापासून चिंताजनक आहे. सरासरी केवळ २८.६१ टक्क्यापर्यंत जलसाठा या तलावात शिल्लक आहे. त्यामुळे यंदाचा हा उन्हाळ भिषण पाणी टंचाईचा जाणार आहे.

ठळक मुद्देजलसाठा २८ टक्क्यांवर : सुरक्षित सिंचन धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मामा तलावांना शेतकऱ्यांचे सुरक्षित सिंचन समजले जाते. मात्र हेच सुरक्षित सिंचन आता धोक्यात आले आहे. यावर्षी अत्यल्प पाऊस पडल्यामुळे जलाशयात पाणी साठू शकले नाही. चंद्रपूर जिल्ह्यात एकूण ९७ मामा तलाव आहेत. मात्र या तलावातील जलसाठ्याची स्थिती आतापासून चिंताजनक आहे. सरासरी केवळ २८.६१ टक्क्यापर्यंत जलसाठा या तलावात शिल्लक आहे. त्यामुळे यंदाचा हा उन्हाळ भिषण पाणी टंचाईचा जाणार आहे.मागील वर्षीचा हंगाम शेतकऱ्यांसाठी अभिशाप ठरला. मोठ्या उत्साहाने पैशाची जुळवाजुळव करुन शेतकरी गतवर्षी खरीपासाठी उभा झाला. मात्र वरूणराजाने त्याचे कंबरडेच मोडले. यावर्षीही पावसाने अनेकवेळा शेतकऱ्यांना दगा दिला. परिणामी शेतकºयांना पिके वाचविताना मोठी कसरत करावी लागली होती. कशीबशी शेतकऱ्यांनी आपली पिके वाचविली. मात्र उत्पादनावर मोठा परिणाम झाला. पाहिजे तसे उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती येत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा कर्जाच्या खाईत लोटला गेला. लावलेला पैसाही निघाला नाही. त्यामुळे डोक्यावरील कर्ज तो फेडू शकला नाही. गतवर्षी शासनाने कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर शेतकऱ्याला दिलासा मिळाला. मात्र तोही क्षणिक ठरला. आता रबी हंगामही संपला आहे. तरीही अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही.यावर्षी अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे जमिनीत पाणी चांगल्या प्रकारे मुरु शकले नाही. सिंचन प्रकल्प, तलाव, बोड्या यात पाणी साठू शकले नाही. ग्रामीण भागात पसरलेले मामा तलावांचे जाळे शेतकऱ्यांसाठी वरदान आहेत. मात्र अत्यल्प पाऊस झाल्यामुळे मामा तलावातही पाण्याची साठवणूक होऊ शकली नाही. मामा तलावांची स्थिती चिंताजनक आहे. सरासरी २८.६१ टक्केच पाणी या तलावांमध्ये शिल्लक आहे.२९ तलावात ठणठणाटजिल्ह्यात जलसाठ्याची स्थिती भयावह दिसून येत आहे. मार्च महिन्याच्या पंधरवाड्यातच जिल्ह्यातील तब्बल २९ तलाव कोरडे पडले आहेत. या तलावात शून्य जलसाठा आहे. यामध्ये चिंधी, कुसर्ला, अड्याळ मेंढा, गोलाभुज, मांगली, देवई, धाबा, धामणगाव, शेगाव खुर्द, खोलदोडा, मुरझा, भसबोरन, अंतरगाव, तांबेगडी मेंढा, पाथरी, सायमारा, वलनी, अड्याळ, कोसंबी, गोलाभूज, राजोली, चिरोली, कोळसा, करंजी, भटाळा, कारगट्टा, मोटेगाव, अडेगाव व काजळसर या तलावांचा समावेश आहे.जिल्ह्यात ९७ मामा तलावचंद्रपूर जिल्ह्यात एकूण ९७ मामा तलाव आहेत. यात आसोलामेंढा नामक मोठा तलाव आहे. आठ मध्यम मामा तलाव आहेत. तर ८८ लघू मामा तलाव आहेत. मोठ्या तलावात ३८.२८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. आठ मध्यम तलावात ३७.५९ टक्के जलसाठा आहे तर उर्वरित ८८ लघू मामा तलावात केवळ १२.३८ टक्के पाणी शिल्लक आहे.