महिला अत्याचार, कौटुंबिक हिंसा अशा घटना कमी झाल्या असताना व लाखो महिलांच्या भावना दारूबंदीच्या समर्थनार्थ असताना दारूबंदी उठवण्यासाठी काही जण प्रयत्न करीत आहेत. अनेक ग्रामसभा, महिला समिती, सामाजिक संघटना यांचा दारू दुकाने सुरु करण्यास प्रखर विरोध आहे. जिल्ह्यातील परिस्थिती लक्षात घेता शासनाने व्यवसायावर आळा घालण्यासाठी कठोर कायदा दुरुस्ती करावा. मंत्रिमंडळ समितीने चंद्रपूर जिल्ह्याचा अभ्यास करण्यासाठी १३ सदस्यीय समिती नेमणूक केली. शासकीय व अशासकीय समिती सदस्यांनी जनतेचा अनादर होऊ न देता चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी कायम ठेवावी, यासाठी युवा स्वाभिमान पार्टी कोरपनाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी तालुका अध्यक्ष मोहब्बत खान, प्रशांत घुंगरूड, नदीम अली, प्रमोद गिरडकर, शहेबाज अली, पवन बुरेवार, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
दारूबंदी कायम ठेवण्यासाठी तहसीलदारांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:35 IST