शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

एसटी वर्कर्सचे विभाग नियंत्रकांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2015 01:08 IST

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कामगारांच्या पगारवाढीच्या झालेल्या करारात अनेक त्रुटी असून

चंद्रपूर: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कामगारांच्या पगारवाढीच्या झालेल्या करारात अनेक त्रुटी असून कामगारांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झालेली आहे. तसेच हजारो कोटी रुपये तोट्यात असलेल्या एमएसईबीमधील कर्मचाऱ्यांना २५ टक्के पगारवाढ देण्यात आलेली आहे. एसटी कामगारांना एमएसईबीप्रमाणे वेतन मिळावे, अशी मागणी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक)चे विभागीय अध्यक्ष तथा राज्य उपाध्यक्ष विजय बोरगमवार यांच्या नेतृत्वात विभागीय नियंत्रक महेंद्र भैसारे यांना निवेदन देऊन करण्यात आली.निवेदनात प्रामुख्याने औद्योगिक कलह अधिनियम १९४७ मधील तरतुदीनुसार कामगार करार रद्द करण्यात यावा व एमएसईबीप्रमाणे २५ टक्के पगारवाढीचा करार करण्यात यावा. २००० ते २०१२ पर्यंत ज्या कामगारांना कनिष्ठ वेतनश्रेणीत तीन वर्षापेक्षा जास्त व पाच वर्ष अथवा अधिक सेवा पूर्ण केली आहे. अशा कर्मचाऱ्यांचे ज्यावेळी तीन वर्ष सेवा पूर्ण झाली आहे, त्यावेळी नियमित वेनतश्रेणी देऊन वेतन निश्चिती करण्यात यावी. १ एप्रिल २०१२ नंतर कनिष्ठ वेतनश्रेणी नियमित वेतनश्रेणीत येताना १३ टक्के कराराचा फायदा देण्यात आलेला नाही. अशा कर्मचाऱ्यांना कराराचा १३ टक्के फायदा देऊन वेतन निश्चित करावे. चालक- वाहक यांच्या ड्युटी एलोकेशन टी- रोटेशनची अंमलबजावणी करण्यात यावी. महिलांना कायद्यानुसार मिळणाऱ्या सोयी प्रदान करण्यात याव्या. अप्रेंटिस उमेदवारांना किमान वेतन कायद्याप्रमाणे विद्यावेतन तत्काळ अदा करण्यात यावे, अशा मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक) चे विभागीय अध्यक्ष तथा राज्य उपाध्यक्ष विजय दोरगमवार यांच्या नेतृत्वात विभाग नियंत्रक महेंद्र भैसारे यांना देण्यात आले. यावेळी शिष्टमंडळात विभागीय सचिव शकील अहमद, कोषाध्यक्ष अशफाक आगार अध्यक्ष नौशाद आगार, सचिव अकरम खान, विभागीय कार्याध्यक्ष अयुब खान उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)