चंद्रपूर : राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचे साहित्य राष्ट्राला जागविणारे व नव्या पिढीला सुसंस्कारित करणारे असल्याने गुरुकुंज आश्रमाद्वारा होणारी ग्रामगीता जीवन विकास परीक्षा प्रत्येक शाळेत होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन चंद्रपूर जिल्हा परिषदचे शिक्षण सभापती देवराव भोंगळे यांनी केले.गुरुकुंज आश्रम मोझरी येथे अ.भा. श्रीगुरुदेव सेवा मंडळद्वारा आयोजित ग्रामगीता जीवन विकास परीक्षा समितीच्या राज्यस्तरीय मेळाव्यात ते बोलत होते. उद्घाटन शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महादेव भुईभार यांच्या हस्ते झााले. अध्यक्षस्थानी सर्वाधिकारी प्रकाश महाराज वाघ होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून चंद्रपूर जि.प.चे शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर, यवतमाळ जि.प. चे शिक्षणाधिकारी डॉ. सुचेता पाटेकर, अशोक कोठारी, सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन बोथे, दामोधर पाटील, प्रचार प्रमुख बबन वानखेडे, लक्ष्मण गमे, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, संघटक प्रेमलाल पारधी, परीक्षा विभागाचे अध्यक्ष केशवदास रामटेके, प्रा. ताराचंद कंठाळे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.प्रास्ताविक सचिव गुलाबराव खवसे यांनी केले. याप्रसंगी शिक्षणाधिकारी डोर्लीकर म्हणाले, ग्रामगीता परीक्षेचा उपक्रम अभिनंदनीय असून या कार्यासाठी शिक्षण विभागाचे नेहमीच सहकार्य राहिले आहे. परीक्षा विभागाचे पदाधिकारी, प्रचारक आणि शिक्षकवृंदाच्या सहकार्यामुळे विद्यार्थी या परीक्षेला बसत आहेत.
ग्रामगीता परीक्षा समितीच्या कार्यकर्त्यांचा राज्यस्तरीय मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2016 00:39 IST