शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

भद्रावतीत आजपासून राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा

By admin | Updated: March 12, 2016 01:24 IST

नगर परिषद भद्रावतीच्या वतीने नागपूर विभागस्तरीय नगराध्यक्ष सुवर्ण चषक क्रीडा स्पर्धा तथा राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन...

उद्धव ठाकरे यांची उपस्थिती : ६७ नगर पालिकांचे एक हजार स्पर्धक होणार सहभागीभद्रावती : नगर परिषद भद्रावतीच्या वतीने नागपूर विभागस्तरीय नगराध्यक्ष सुवर्ण चषक क्रीडा स्पर्धा तथा राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन १२ ते १४ मार्चपर्यंत स्थानिक नीळकंठराव शिंदे महाविद्यालय येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी भद्रावती नगरी सज्ज असून या स्पर्धेत ६७ नगर पालिकांचे एक हजार स्पर्धक सहभागी होणार आहेत.स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी दुपारी ४ वाजता शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून खासदार तथा शिवसेना सचिव विनायक राऊत, आ. बाळू धानोरकर, नागपूर विभाग आयुक्त अनुपकुमार, जिल्हाधिकारी डॉ.दीपक म्हैसेकर, पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, माजी आ. नीळकंठराव शिंदे, महाराष्ट्र बॉक्सींग संघटनेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र आॅलिम्पिक संघटनेचे उपाध्यक्ष जय कवळी इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.नगराध्यक्ष चषक स्पर्धेत नागपूर विभागातील ६७ नगर पालिकेचे नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी असे मिळून एक हजार स्पर्धक सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत व्हॉलीबॉल, क्रिकेट, कबड्डी, बॅडमिंटन, १००, ४०० व ८०० मीटर धावणे इत्यादी क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, उपाध्यक्ष प्रफुल चटकी, मुख्याधिकारी विनोद जाधव व न.प.चे पदाधिकारी तथा कर्मचारी परीश्रम घेत आहेत. मैदानावर बॉक्सिंग एरीना तयार करण्यात आला असून कबड्डी व व्हॉलीबॉलचे दोन मैदान तयार करण्यात आली आहेत. एकाच मैदानावर होणाऱ्या या स्पर्धा भद्रावतीकरांसाठी मुख्य आकर्षण राहणार आहेत. न.प.भद्रावतीच्या कार्यालयातील अंतर्गत रचना ही एखाद्या कार्पोरेट कार्यालयाला साजेशी अशी करण्यात आली आहे. तसेच भद्रावती येथील महत्त्वाच्या स्थळांना भेटी देण्यासाठी खेळाडंूसाठी न.प.द्वारे विशेष व्यवस्थाही करण्यात आली आहे. (शहर प्रतिनिधी)