शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

मत्स्यपालन, सिंगाडा उत्पादनासाठी हवे राज्य शासनाचे सहकार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 00:33 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील विविध तालुक्यात कार्यरत मत्स्यपालन सहकारी संस्थेचे सभासद विविध मालगुजारी तलावात मत्स्यपालन व सिंगाड्याचे उत्पादन घेतात.

ठळक मुद्देमत्स्यपालन संस्थाची मागणी : लोप पावत असलेल्या व्यवसायाला गती द्यावी

आॅनलाईन लोकमतसास्ती : चंद्रपूर जिल्ह्यातील विविध तालुक्यात कार्यरत मत्स्यपालन सहकारी संस्थेचे सभासद विविध मालगुजारी तलावात मत्स्यपालन व सिंगाड्याचे उत्पादन घेतात. यातूनच त्यांच्या कुटुंंबीयांचा उदरनिर्वाह होते. परंतु, या व्यवसायाकरिता त्यांना कमालीची कसरत करावी लागत आहे. मत्स्यपालन बिजाई व सिंगाडा लागवडीकरिता त्यांना मोठ्या निधीची आवश्यकता पडत असून शासनाने अशा संस्थांना आर्थिक सहकार्य करावे, अशी मागणी होत आहे.जिल्हा परिषदेच्या अधिनस्त असलेले तलाव पंचायत समितीच्या मार्फतीने मत्स्यपालन व सिंगाडा शेती व्यवसायाकरिता लिजवर मत्स्यपालन सहकारी संस्थांना दिले जाते. परंतु, अशा तलावात मोठ्या प्रमाणात वाढलेल्या इकोर्निया सदृष्य वनस्पती व गावातील कचºयामुळे मत्स्यपालन किंवा सिंगाडा शेती व्यवसाय करणे अवघड होते. त्याकरिता तलावाची स्वच्छता करणे गरजेचे असते.उत्पादनाचे स्वप्न रंगविणाºया या मच्छिमार संस्थांना रखरखत्या उन्हात तलाव स्वच्छ करण्याकरिता घाम गाळावा लागतो. यात मोठी मेहनत व आर्थिक फटका बसतो. राजुरा तालुक्यातील बामनवाडा येथे जिल्हा परिषदेच्या अधिनस्त असलेला मोठा तलाव आहे.सदर तलाव पंचायत समितीच्या माध्यमातून मत्स्यपालन व सिंगाडा शेती व्यवसायाकरिता दरवर्षी सहकारी संस्थांना दिला जातो. राजुरा येथील मच्छिंद्र मत्स्यपालन सहकारी संस्था १९६१ पासून दरवर्षी हा तलाव घेवून त्यात व्यवसाय करतात.मच्छिंद्र मत्स्यपालन सहकारी संस्थेत तिनशेहून अधिक सदस्य आहेत. त्यातील काही सदस्य हे तलाव घेवून सिंगाडा शेती व मत्स्यपालन करतात. परंतु, याकरिता तलाव स्वच्छ करणे गरजेचे असते. तसेच सिंगाडा लागवड करण्याकरिता व मत्स्यपालनाच्या बिजाई करिता त्यांना निधीची आवश्यकता असते. त्यामुळे तलावाची स्वच्छता करून दिली पाहिजे व बिजाईकरिता आर्थिक सहकार्य करावे, अशी मागणी मच्छिंद्र मत्स्यपालन सहकारी संस्थेचे अध्यक्ष विजय कार्लेकर, छबन पचारे, मारोती कार्लेकर, अशोक कार्लेकर, घनश्याम कार्लेकर आदींनी केली आहे. याची शासनाने तत्काळ दखल घेण्याची मागणी आहे.मत्स्यपालन व सिंगाडा शेती करण्याकरिता मच्छिमार बांधव मोठी मेहनत घेतात. परंतु, शेतकºयांप्रमाणेच आमच्याही पदरात काही येण्याआधीच संकटाची मालिका सुरू होते. सध्या एक नवे संकट उभे टाकले आहे. ते म्हणजे तलावात वाढलेली वनस्पती व कचरा. या वनस्पतीमुळे उत्पादन तर सोडाच, सिंगाडा लागवड करणेही कठीण होत आहे. त्यामुळे शासनाने मच्छिमार बांधवांना सिंगाडा शेतीसाठी व मत्स्यपालनासाठी निधी उपलब्ध करून द्यावा.- सर्वानंद वाघमारे, उपसरपंच, बामनवाडा