शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

स्टेट बँक गृह कर्ज घोटाळा व्यापक; तांत्रिक बाबींवर तपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2022 05:00 IST

तीन वर्षांपासून भारतीय स्टेट बँकेत शहरातील नामांकित बिल्डरांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून १४ कोटी २६ लाखांनी बँकेची फसवणूक केली आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने २३ व २४ फेब्रुवारी रोजी एजंटसह १२ कर्जधारकांना अटक केल्यानंतर खळबळ उडाली. दरम्यान, मंगळवारी पोलिसांनी बँकेचे व्यवस्थापक पंकजसिंग सोळंकी, व्यवस्थापक विनोद लाटेलवार, मुख्य क्रेडिट व्यवस्थापक देविदास कुळकर्णी यांना अटक केली.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : भारतीय स्टेट बँकेतील गृहकर्ज १४ कोटी २४ लाखांच्या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याची बाब पोलीस तपासात पुढे येत आहे. या प्रकरणातील तांत्रिक बाबींवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले असून फसवणुकीची रक्कमही वाढण्याची शक्यता वर्तविली आहे. या प्रकरणाचा सर्व बाजूने खोलात जाऊन तपास करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी दिली. या घोटाळ्यामध्ये बिल्डर, आयकर सल्लागार, मूल्यनिर्धारकांसह अनेक बड्या हस्तींचा सहभाग असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणात गुरुवारी १२ कर्जधारकांसह तीन बँक अधिकाऱ्यांना जामीन मंजूर झाला. या प्रकरणात शेळके, जावडेकर, चांदूरकर आणि मूल शाखेतील वरीयाणी ही मंडळी फरार आहेत. फसवणूक प्रकरणाची माहिती लीक झाल्याने ही मंडळी आर्थिक गु्न्हे शाखेचे पथक मुंबई व नागपूरला पोहोचण्यापूर्वीच फरार झाल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे मजुरांच्या नावावर बनावट कागदपत्रे तयार करून कर्ज दिले गेल्याची माहितीही पुढे येत आहे.      तीन वर्षांपासून भारतीय स्टेट बँकेत शहरातील नामांकित बिल्डरांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून १४ कोटी २६ लाखांनी बँकेची फसवणूक केली आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने २३ व २४ फेब्रुवारी रोजी एजंटसह १२ कर्जधारकांना अटक केल्यानंतर खळबळ उडाली. दरम्यान, मंगळवारी पोलिसांनी बँकेचे व्यवस्थापक पंकजसिंग सोळंकी, व्यवस्थापक विनोद लाटेलवार, मुख्य क्रेडिट व्यवस्थापक देविदास कुळकर्णी यांना अटक केली. बँकेच्या नागपूर शाखेतील व्यवस्थापक उज्ज्वल शेळके यांच्यासह मुंबई येथील चांदूरकर, जावडेकर हे दोन अधिकारी व मूल शाखेत कार्यरत अधिकारी वरियाणी व इतर ठिकाणी कार्यरत असलेले दोन अधिकारी असे एकूण पाच अधिकारी फरार आहेत. या पाचही जणांना अटक करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे पथक शोध घेत आहे. यातील एक तेलंगणा राज्यातील मूळ रहिवासी असलेला व बँकेत अधिकारी पदावर काम करणारा आणि सध्या बँकेनेच त्याची एजंट म्हणून नियुक्त केलेला सेवानिवृत्त अधिकारीही फरार आहे. हाच अधिकारी या फसवणूक प्रकरणातील मुख्य कारभारी असल्याची चर्चा बँकेच्या वर्तुळात आहे. बिल्डर व बँकेतील कर्ज विभागातील मुख्य दुवा हाच अधिकारी होता, असेही सांगण्यात येत आहे. दरम्यान, बँकेने नियुक्त केलेले मूल्यधारक, बिल्डर तथा बनावट आयकर विवरण तयार करून देणारे आयकर सल्लागार यांचाही या प्रकरणात सहभाग असल्याची माहिती समोर येत आहे. त्यातही बिल्डर सहभागी आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे पथक नागपूर व मुंबई येथे पोहोचले तेव्हा शेळके, चांदूरकर व जावडेकर हे बँकेचे तीन वरिष्ठ अधिकारी फरार झाले होते, अशी माहिती तपास अधिकारी दीपक मस्के यांनी दिली.

मोखळाला-रमण जोडी चर्चेतस्टेट बँक ऑफ इडियाच्या मुख्य शाखेचे क्षेत्रीय प्रबंधक मोखळाला हे हा कर्ज घोटाळा झाला तेव्हा  होते. तर कर्ज प्रकरणे डी. व्ही. रमण या अधिकाऱ्याच्या माध्यमातून होत होती, अशी माहिती पुढे येत आहे. हे दोन्ही अधिकारी बँकेतून सेवानिवृत्त झाले असून ते मूळचे तेलंगणातील रहिवासी आहेत. उल्लेखनीय, रमण यांना बँकेने सेवानिवृत्तीनंतर एजंट म्हणून नियुक्त केल्याचे बोलले जात आहे. गृहकर्ज घोळाटा प्रकरण उघडकीस आल्यापासून मोखळाला व रमण या जोडीची चर्चा आहे. 

सुप्रीम फरार - या घोटाळ्यात सुप्रीम नावाच्या एजंटचे नावही जोडले जात आहे. कारागृहातून सुटलेल्यांनी याच एजंटचे नाव घेतले आहे. एका सदनिकेत एका नामांकित बिल्डरने एकाच मजल्यावरील एक फ्लॅट २९ लाखांत व बाजूचा फ्लॅट  ५१ लाखांत बँकेचे कर्ज घेवून विक्री केला आहे. या प्रकरणातही बनावट कागदपत्रे तयार केली आहेत. हा सुप्रीम नावाचा एजंट फरार          आहे.

 

टॅग्स :bankबँकfraudधोकेबाजी