शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वेळेच्या आधीच सिनेमा सुरू; ‘झाॅलीवूड’ च्या रसिकांचा संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2022 05:00 IST

पूर्व विदर्भातील झाडीपट्टी रंगभूमीची कहानी कथन करणारा ‘झॉलीवूड’ चित्रपट आहे. विशेष म्हणजे यातील मुख्य कलाकार चंद्रपुरातीलच आहेत. त्यामुळे या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता आहे. त्यामुळेच प्रेक्षकांनी शनिवारी नोवा चित्रपटगृहातील सकाळी ११.३० वाजताच्या शोची तिकिटे बुक केली होती. परंतु हा सिनेमा १ तासापूर्वीच, म्हणजे १०.३० वाजताच सुरू करण्यात आला. प्रेक्षक निर्धारित वेळेवर टॉकीजमध्ये गेल्यानंतर वेळेपूर्वीच सिनेमा सुरू झाल्याचे समोर आले.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : झाडीपट्टी रंगभूमीवरील सध्या चर्चेत असलेला ‘झॉलीवूड’ हा सिनेमा महाराष्ट्रातील सिनेमागृहात ३ जून रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. पूर्व विदर्भातील १३० कलावंत असलेल्या या सिनेमाला स्थानिक कलावंतांच्या भूमीतच उपेक्षित राहावे लागत असल्याचा प्रकार शनिवारी चंद्रपुरातील नोवा सिनेमागृहात समोर आला. सिनेमाची निर्धारित वेळ सकाळी ११.३० वाजताची असताना एक तासापूर्वीच सिनेमा सुरू करण्यात आला. त्यामुळे स्थानिक कलावंतांचा सिनेमा पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांची प्रचंड निराशा झाली. वेळापूर्वी सिनेमा सुरू केलाच कसा, असा प्रश्न प्रेक्षकांनी उपस्थित करत सिनेमागृहात गदारोळ घातला. एका तासाच्या गदारोळानंतर पुन्हा १२ वाजता सिनेमा सुरू करण्यात आला. पूर्व विदर्भातील झाडीपट्टी रंगभूमीची कहानी कथन करणारा ‘झॉलीवूड’ चित्रपट आहे. विशेष म्हणजे यातील मुख्य कलाकार चंद्रपुरातीलच आहेत. त्यामुळे या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता आहे. त्यामुळेच प्रेक्षकांनी शनिवारी नोवा चित्रपटगृहातील सकाळी ११.३० वाजताच्या शोची तिकिटे बुक केली होती. परंतु हा सिनेमा १ तासापूर्वीच, म्हणजे १०.३० वाजताच सुरू करण्यात आला. प्रेक्षक निर्धारित वेळेवर टॉकीजमध्ये गेल्यानंतर वेळेपूर्वीच सिनेमा सुरू झाल्याचे समोर आले. तेथील कर्मचाऱ्यांनी सिनेमा संपला, आता थेट उद्याला या, अशी बतावणी प्रेक्षकांना केली. त्यामुळे प्रेक्षकांचा संताप अनावर झाला. यावेळी चित्रपटातील स्थानिक अभिनेत्री निशा धोंगडे उपस्थित होत्या. त्यांनी थेट सिनेमागृहाच्या संचालकांशी संपर्क साधून या प्रकारावर रोष व्यक्त केला. तसेच पुन्हा चित्रपट दाखविण्याची मागणी केली. प्रेक्षकांचा रोष बघून संचालकांनी सर्वांना १२ वाजताचा मोफत सिनेमा         दाखविला. 

चित्रपटाचा फलकच नाही- एरवी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सिनेमागृहात मोठमोठे पोस्टर लावण्यात येतात. परंतु मातीतील कलावंतांच्या या मराठी सिनेमाचे पोस्टरच सिनेमागृहाने लावले नाही. मात्र, तिथे इतर हिंदी चित्रपटांचे मोठे पोस्टर लागलेले आहेत. यावरून स्थानिक कलावंतांची सिनेमागृहाने उपेक्षाच केल्याचे दिसून येते.

अत्यंत संघर्षानंतर झाटीपट्टी रंगभूमी रुपेरी पडद्यावर आली आहे. त्यामुळे  सिनेमागृह संचालकांनी आपल्या मातीतल्या कलाकारांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. परंतु, चंद्रपुरातील सिनेमागृहाने वेळेपूर्वीच चित्रपट सुरु करुन कलावंताची उपेक्षाच केली.                                        - निशा धोंगडे, अभिनेत्री  

 

टॅग्स :cinemaसिनेमा