शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

पेसा गावात तेंदू संकलन सुरू करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2019 00:57 IST

कोरपना तालुक्यातील वनसडी वनपरिक्षेत्रातील पेसा अंतर्गत येणाऱ्या सात गावांतील तेंदू संकलन केंद्र तातडीने सुरु करावे, अशी मागणी शेतकरी संघटनेने तेंदूपत्ता संकलन केंद्र सुरु करणाºया समितीकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ठळक मुद्देशेतकरी संघटना : मजुरांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरपना तालुक्यातील वनसडी वनपरिक्षेत्रातील पेसा अंतर्गत येणाऱ्या सात गावांतील तेंदू संकलन केंद्र तातडीने सुरु करावे, अशी मागणी शेतकरी संघटनेने तेंदूपत्ता संकलन केंद्र सुरु करणाºया समितीकडे निवेदनाद्वारे केली आहे.कोरपना तालुक्यातील वनसडी वनपरिक्षेत्रातील पार्डी, परसोडा, कोठोडा, लांबोरी, दुगार्डी, मांगलहिरा, मांडवा ही सात गावे पेसा अंतर्गत येतात. या गावांत अद्यापही तेंदूपत्ता संकलनाचे केंद्र सुरु झालेले नाही. या गावांत तेंदूपाने संकलन केंद्र सुरु करण्यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी, मुख्य वनसंरक्षक व उपवनसंरक्षक यांची एक समिती याविषयी मंजूरी प्रदान करते. परंतु अन्यत्र तेंदूपाने संकलन केंद्र सुरु झाले असतानाही अद्याप या भागात संकलन केंद्र मंजूर करण्याची कार्यवाही झाली नाही. यामुळे या सातही गावातील मजुरांना काम उपलब्ध नसल्याने त्यांच्या उदरनिवार्हाचा प्रश्न निर्माण झाला आहे.या तेंदू संकलन करणाºया कुटूंबांना केंद्र सुरु न झाल्याने ही वेळ निघुन जाते की, काय अशी भिती सतावत आहे. संकलनाचा वेळ निघुन गेल्यास तेंदूपाने मिळणे कठिण जाते. त्यामुळे येथील ग्रामस्थांनी अ‍ॅड. वामनराव चटप यांच्याकडे आपली समस्या मांडली. याविषयी दखल घेऊन निर्णय घेणाºया समितीचे प्रमुख जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यपालन अधिकारी, वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक आणि वनविभागाचे उपवनसंरक्षक यांना पत्र लिहून तातडीने समितीची बैठक घेऊन संकलन केंद्र सुरु करण्याची करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे नेते, माजी आमदार अ‍ॅड. चटप, प्रभाकर दिवे, अरुण नवले, अनिल ठाकुरवार, श्रीनिवास मुसळे, निळकंठ कोरांगे, जोत्स्ना मोहितकर, पोर्णिमा निरंजने, बंडू राजुरकर, रवींद्र गोखरे, अविनाश मुसळे, अनंता गोडे, भुमन्ना चुकाबोटलावार, संजय येरमे, बाबाराव खडसे, विनोद तुमराम यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

टॅग्स :forestजंगल