शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांचे साखळी उपोषण प्रारंभ

By admin | Updated: May 23, 2017 00:33 IST

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत. त्याबाबत शिक्षक संघटनांनी निवेदने, चर्चा, आंदोलने करून पाठपुरावा केला.

विविध समस्या : संघटना समन्वय समितीचे आंदोलनलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत. त्याबाबत शिक्षक संघटनांनी निवेदने, चर्चा, आंदोलने करून पाठपुरावा केला. तरीही अद्याप समस्या जैसे थे आहेत करिता सर्व संघटनांनी समन्वय समितीची स्थापना करीत जिल्हा परिषद चंद्रपूर समोर २२ ते २६ मेपर्यंत आयोजित साखळी उपोषण सोमवारपासून सुरू केले आहे.मागील वर्षभरापासून प्राथमिक शिक्षकांची विषय शिक्षक पदस्थापना प्रलंबित आहे. त्यामुळे अनेक शाळांमधील इयत्ता आठवीचे वर्ग तुटत आहेत, शिक्षक विनाकारण अतिरिक्त होत आहेत, मागील तीन वर्षांपासून जिल्ह्यात अनेक शिक्षक अतिरिक्त आहेत त्यांचे समायोजन रखडले आहे. वर्षभरापासून ७७२ शिक्षक वरिष्ठ वेतन श्रेणीपासून वंचित आहेत, अवघड क्षेत्र निवडतांना अनेक तालुक्यात अन्याय झाला आहे, पंचायत समितीने सुचविलेली पात्र गावे घेण्यात आलेले नाहीत, जिल्हा अंतर्गत बदल्यासाठी ३१ मे अंतिम तारीख असताना अद्याप काहीच हालचाल करण्यात आली नाही. यासह शिक्षकांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत.याविरोधात कृती समितीने सर्वप्रथम ३० डिसेंबरला निवेदन दिले त्यानंतर महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीने २४ एप्रिलला व अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने २८ एप्रिलला जिल्हा परिषदेसमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले. या आंदोलनामध्ये प्रशासनाने सर्व समस्या तत्काळ निकाली काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आता मे महिना उलटत चालला आहे. तरीही कोणतीही समस्या निकाली काढण्यात आलेली नाही. त्याकरिता जिल्ह्यातील १७ शिक्षक व कर्मचारी संघटनांनी एकत्र येत समन्वय समितीची स्थापना केली व सोमवारपासून साखळी उपोषणाला सुरुवात केली.पहिल्या दिवशी कैलास म्हस्के, चंद्रकांत पांडे, दीपक वर्हेकर, गणपत विधाते, संजय लांडे, साईबाबा इंदूरवार, आदेश वंजारी, मोरेश्वर बोन्डे, कालिदास वाळके, सुनील ढोके, अनिल आवळे, दुष्यांत निमकर, सुनील दुधे आदी शिक्षकांनी उपोषण केले. याप्रमाणे २६ मेपर्यंत दररोज प्रत्येक संघटनेचे दोन प्रतिनिधी उपोषण करणार आहेत.साखळी उपोषणाचे नेतृत्व निमंत्रक विजय भोगेकर, सहनिमंत्रक मुकुंदा जोगी, कोषाध्यक्ष राजू लांजेकर, सहकोषाध्यक्ष अलका ठाकरे यांचेसह सदस्य ओमदास तुरानकर, उमाजी कोडापे, विलास बोबडे, संजय पडोळे, हरीश ससनकर, सुनील उईके, बंडू डाखरे, राजकुमार वेल्हेकर, नागेश सुखदेवे, रवींद्र उरकुडे, कविता गेडाम, नगाजी साळवे, गोसाई धोटे, राजू दर्वे यांच्या नेतृत्वात करण्यात येत आहे. साखळी उपोषणाला केंद्रप्रमुख संघटनेचे रामराव हरडे यांनी पाठिंबा दर्शविला आहे. तसेच पहिल्या दिवशी जिल्ह्यातील शेकडो शिक्षकांनी आंदोलन मंडपाला भेट दिली.