नागभीड तालुक्यातील गोविंदपूर येथून ब्रह्मपुरी व चिमूर आगारांच्या दोन बस नियमित सुरू होत्या. मात्र, देशात कोरोना महामारी आल्याने २० मार्च २०२० पासून नागभीड-गोविंदपूर-सोनापूर आणि चिमूर-गोविंदपूर-तळोधी या मार्गांवरून दिवसातून दोन येरझऱ्या मारणाऱ्या बस बंद करण्यात आल्या. मात्र, सद्यस्थितीत दहा महिन्यांचा काळ लोटला असून, कोरोना आटोक्यात येण्याच्या मार्गावर आहे. हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. सर्व बसफेऱ्या सुरू झाल्या असून, या दोन्ही आगारांनी गोविंदपूर येथून सुटणाऱ्या बसफेऱ्या सुरू केल्या नाहीत. यामुळे या परिसरातील नागरिकांना प्रवासासाठी मोठी पंचाईत होत आहे. गोविंदपूर परिसरातील अनेक गावांतील नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी किंवा तळोधी बाजारपेठेशी दररोज संबंध येतो. मात्र, बसफेरी नसल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे बसफेऱ्या सुरू कराव्यात, अशी मागणी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रमेश आळे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी केली आहे.
गोविंदपूर मार्गावरील बसफेऱ्या सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:20 IST