शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

धान खरेदीचे २४ केंद्र सुरू

By admin | Updated: October 29, 2016 00:45 IST

जिल्ह्यातील धान पिकाविणाऱ्या शेतकऱ्यांना धान्य विक्री करता यावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात २४ खरेदी केंद्रांना मंजूरी दिली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता : मार्केटिंग फेडरेशनचे १३ तर आदिवासी विकास महामंडळाचे १९ केंद्र चंद्रपूर : जिल्ह्यातील धान पिकाविणाऱ्या शेतकऱ्यांना धान्य विक्री करता यावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात २४ खरेदी केंद्रांना मंजूरी दिली आहे. २४ आॅक्टोंबरपासून हे खरेदी केंद्र सुरू झाले असून यात मार्केटींग फेडरेशनचे १३ तर आदिवासी विकास महामंडळाच्या १९ केंद्रांचा समावेश आहे. २०१६-१७ या खरीप पणन हंगामासाठी शासनाने १९ आॅक्टोबरच्या शासन निर्णयानुसार किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत धान खरेदी करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किमान आधारभुत किमतीचा लाभ मिळावा या हेतुने बिगर आदिवासी क्षेत्रात महाराष्ट्र स्टेट को-आॅफ मार्केटिग फेडरेशन यांच्या मार्फत १३ धान खरेदी केंद्र व आदिवासी विकास महामंडळ नाशिक यांच्या मार्फत १९ धान खरेदी केंद्र २४ आॅक्टोबरपासून सुरु करण्याकरिता जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी मान्यता दिली आहे. या सर्व केंद्रावर धान खरेदी सुरु झाली आहे.आधारभूत योजने अंतर्गत धान खरेदीचे दर हे अ दर्जाच्या धानाकरिता प्रति.क्विटल १५१० व साधारण धानाकरिता १४७० प्रति.क्विटल असे शासनाने ठरवून दिलेले आहेत. मात्र या किंमतीमध्ये बोनसचा समावेश करण्यात आलेला नाही. किमान आधारभुत किंमत योजनेत केंद्र शासनाने ठरविलेल्या निकषाच्या आधारे निदेर्शात बसणारे ‘अ’ दजार्चेच धान्य खरेदी केल्या जाणार असून धानाचे आर्द्रतेचे प्रमाण जास्तीत जास्त १७ टक्के इतके असावे. तेव्हा शेतकऱ्यांनी आपले धान स्वच्छ व कोरडे करुन विक्रीस आणावे. नमूद प्रमाणपेक्षा जास्त आर्द्रता असलेले धान खरेदी केंद्रावर स्वीकारल्या जाणार नाही, असेही प्रशासनाने कळविले आहे. त्यामुळे या खरेदी केंद्राबा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. (स्थानिक प्रतिनिधी)सातबारा आणणे अनिवार्यशेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर धान विक्रीस आणताना सोबत आधार कार्ड व बॅकेचे पासबुक घेवून यावे. तसेच चालु वर्षाच्या सातबारा उताऱ्यावर धानाची नोंद असलेल्या सातबाराची प्रत सोबत आणणे अनिवार्य केले आहे.तक्रार असल्यास संपर्क साधण्याचे आवाहनतालुका निहाय खरेदी केंद्राची नावे जाहिर करण्यात आली असून खरेदी केंद्रावर धान उत्पादक शेतकऱ्यांना काही अडचण भासल्यास त्याची माहिती पणन अधिकारी प्रादेशिक व्यवस्थापन बोंगीरवार व गजानन कोटलावार यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन चंद्रपूरचे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केले आहे.