शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर ना पगार मिळतोे; ना वैद्यकीय बिले मिळतात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 05:00 IST

एसटी महामंडळ पूर्वीपासूनच आर्थिक तोट्यात असते. त्यातच कोरोनाच्या संकटामुळे उत्पन्नच ठप्प झाले होते. आता काही प्रमाणात बसफेऱ्या सुरू झाल्या असल्या तरी अद्यापही महामंडळाला आर्थिक सुबकता आली नाही. याचा परिणाम कर्मचाऱ्यांवर वेतनावर आला. परिणामी कर्मचाऱ्यांच्या महिन्याच्या वेतनाला बराच विलंब लागत आहे. कधी दहा दिवस तर कधी महिना संपून पंधरवडाही उलटतो. तरीही वेतन मिळत नाही. यासोबतच कर्मचाऱ्यांची वैद्यकीय बिलेदेखील रखडली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सर्वात श्रीमंत म्हणून ओळखले जाणाऱ्या एसटी महामंडळाला कोरोनामुळे मोठा फटका बसला आहे. आता या महामंडळाची चाके पूर्ववत येत आहेत. मात्र अद्यापही उभारी मिळाली नाही. परिणामी कर्मचाऱ्यांच्या वेतनात नेहमीच दिरंगाई होत आहे. यासोबत वैद्यकीय बिलेही वेळेत मिळत नसल्याने एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना नेहमीच आर्थिक संकटाला सामोर जावे लागते. मागील वर्षी कोरोनाने महामंडळाच्या बसफेऱ्या बंद करण्यात आल्या. परिणामी महामंडळाला मोठा फटका सहन करावा लागला. एसटी महामंडळ पूर्वीपासूनच आर्थिक तोट्यात असते. त्यातच कोरोनाच्या संकटामुळे उत्पन्नच ठप्प झाले होते. आता काही प्रमाणात बसफेऱ्या सुरू झाल्या असल्या तरी अद्यापही महामंडळाला आर्थिक सुबकता आली नाही. याचा परिणाम कर्मचाऱ्यांवर वेतनावर आला. परिणामी कर्मचाऱ्यांच्या महिन्याच्या वेतनाला बराच विलंब लागत आहे. कधी दहा दिवस तर कधी महिना संपून पंधरवडाही उलटतो. तरीही वेतन मिळत नाही. यासोबतच कर्मचाऱ्यांची वैद्यकीय बिलेदेखील रखडली आहेत.

वैद्यकीय बिले मिळण्यास बराच विलंबएकीकडे कामगारांचे पगार वेळेवर होत नाहीत. कामगार व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांंना मेडिकल सुविधांची बिलेदेखील वेळेत मिळत नसल्याने कर्मचारी मेटाकुटीला आले आहेत. कोरोनाकाळात पगार बंद, आता पगार वेळेवर नाही व त्यात स्वत:चे व कुटुंबातील सदस्यांचे आजारपण याच्याकडेदेखील दुर्लक्ष होत आहे

कधी पंधरवडा, तर कधी दिवस उशिरा वेतनकोरोनाच्या पूर्वी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन काही प्रमाणात नियमित होत होते. मात्र कोरोनाचे संकट असल्याने महामंडळाला मोठा फटका बसला. महिना भरल्यानंतर कधी दहा दिवसांनी तर कधी पंधरा दिवसांनी वेतन मिळते. काही वेळेस तर दोन महिने वेतन थकीत होते. याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे    आहे.

उपचारावर झालेला खर्च आणायचा कुठून ?कोरोनाबरोरबरच इतर आजाराने महामंडळातील कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबातील लोकांना ग्रासले होते. अनेकांना रुग्णालयात भरती करावे लागले. कर्मचाऱ्यांनी नेमून दिलेल्या डॉक्टरांकडे औषधोपचार केला. त्याची बिलेदेखील कार्यालयामध्ये जमा केली. मात्र अद्यापपर्यंत त्याची रक्कम जमा झाली नसल्याची ओरड कर्मचाऱ्यांकडून होत आहे.

 

टॅग्स :state transportएसटी