शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

ब्रम्हपुरी बस आगारातील वाहतूक नियंत्रकाचा संशयास्पद मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2021 17:26 IST

ब्रह्मपुरी आगारातील वाहतूक नियंत्रक पदावर कार्यरत असलेले सत्यजित सिंग ठाकूर यांचा त्यांच्या राहत्या घरी संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे.

चंद्रपूर : ब्रह्मपुरी आगारातील वाहतूक नियंत्रक पदावर कार्यरत असलेले सत्यजित सिंग ठाकूर वय ३० वर्षं यांचा त्यांचे राहते घरी संशयास्पद मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना रविवारी घडली असून सोमवारला उघडकीस आली आहे.

सविस्तर प्राप्त माहितीनुसार मृतक सत्यजित सिंग ठाकूर नागपूरचे रहिवासी असून गेल्या वर्षभरापासून ब्रह्मपुरी आगारात वाहतूक नियंत्रक पदावर कार्यरत होते. ते ब्रम्हपुरी आगाराच्या मागील परिसरात किरायाने वास्तव्यास राहत होते.

सध्या राज्य सरकारमध्ये विलीन करण्याच्या प्रमुख मागणीसह एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी अन्य मागण्यांसाठी राज्यभर संप पुकारला आहे. परिणामी ब्रह्मपुरी आगारांमध्ये वाहक आणि चालक संपावर असल्यानेही बसेस बंद आहेत. परंतु मृतक हे कार्यालयीन कामकाज पहात असल्याने कार्यालयीन कर्मचाऱ्यांचा संपात सहभाग नव्हते असे सांगण्यात आले आहे.

परंतु मृतक हे आपल्या पत्नीचा फोन उचलत नव्हते. त्याच्या पत्नीने आगारातील कर्मचाऱ्यांना ही बाब सांगितली असता कर्मचारी त्याच्या घरी गेले असता सत्यजित सिंग ठाकूर हे पलंगावर मृत अवस्थेत आढळून आले. माहिती मिळताच ब्रह्मपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक रोशनकुमार यादव यांनी तातडीने आपल्या ताफ्यासह घटनास्थळ गाठले. व मृतदेह आपल्या ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रोशन कुमार यादव यांचे मार्गदर्शनाखाली सुरेंद्र उपरे पी एस आय पोलीस हवालदार अरुण पिसे करीत आहेत.

दरम्यान, किमान वेतन कायद्यानुसार वेतन देण्यात यावे, इतर राज्याच्या धर्तीवर महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे, शासकीय कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सोयीसवलती महामंडळातील कर्मचाऱ्यांना द्याव्यात या मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. काही दिवसांआधी एका एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. तर, आता ठाकूर यांच्या संशयास्पद मृत्यूनेही अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

टॅग्स :Deathमृत्यू