शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
4
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
5
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
6
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
7
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
8
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
9
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
10
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
11
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
12
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
13
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
14
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
15
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
16
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
17
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
18
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
19
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
20
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...

चुकीच्या औषध फवारणीने कपाशी करपली

By admin | Updated: September 15, 2014 00:02 IST

पेरणीनंतर कपाशीचे पीक बहरु लागले असताना तण नाशकासाठी कृषी केंद्रातून औषधी घेतली. मात्र कृषी केंद्रधारकाने चुकीची औषधी देवून शेतकऱ्याला त्याची फवारणी करण्याचा सल्ला दिला.

चिमूर : पेरणीनंतर कपाशीचे पीक बहरु लागले असताना तण नाशकासाठी कृषी केंद्रातून औषधी घेतली. मात्र कृषी केंद्रधारकाने चुकीची औषधी देवून शेतकऱ्याला त्याची फवारणी करण्याचा सल्ला दिला. मात्र फवारणी केल्यानंतर दोन-तीन दिवसातच अख्खे कपाशीचे पीक कोमेजून गेले. त्यामुळे नवेगाव पेठ येथील शेतकरी नरेंद्र शिरभैये यांचे लाखों रुपयाचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चिमूर तालुक्यातील नवेगाव पेठ येथील रहिवाशी नरेंद्र भैयालाल शिरभैये याची वडाळा पैकु तलाठी साजाअंतर्गत येत असलेल्या भु.क्र. ६५ वर शिरभैये यांनी १० एकरात कपाशीची लागवड केलीे. कपाशीचे निंदन, खुरपण, डवरणी योग्यप्रकारे केल्याने कपाशीचे पीक चांगल्या स्थितीत होते. कपाशीमध्ये पुन्हा कचरा होऊ नये, गवत वाढू नये, याकरीता शिरभैये यांनी चिमूर येथील मासळ चौकातील जय श्रीहरी अ‍ॅग्रोटेक येथून जाऊन आवश्यक असलेली गरुड किंवा आलकील ही तणनाशक औषधी मागितली. मात्र कृषी केंद्रधारकाने ग्लॉयसोपिक गोदरेज नावाचे तणनाशक औषध शिरभैये यांना दिले. ग्लॉयसोपिक गोदरेज नावाचे तणनाशक औषधाची शिरभैये यांनी आपल्या १० एकरातील कपाशीवर फवारणी केली असता एक ते दोन दिवसातच कपाशी कोमजून तिची अवस्था मरणासन्न झाली. कपाशी सुकण्याची परिस्थिती निर्माण झाल्याने जवळपास हातात आलेले पीक चुकीच्या औषधीने पुर्णत: नष्ट होण्याच्या मार्गावर येवून ठेपले आहे. चुकीची औषधी कृषी केंद्रधारकाने दिल्याची माहिती शेतकरी नरेंद्र शिरभैये यांनी पत्रकारांना दिली. असून त्यांच्या चुकीच्या औषधीमुळे माझ्या शेतातील १० एकरातील कपाशी नष्ट होत असून लाखो रुपयांच्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.शेतकऱ्यांना चुकीचे औषधी देणाऱ्या कृषी केंद्रावर कारवाई करण्याची मागणी सदर शेतकऱ्याने केली आहे. चुकीचा औषध पुरवठा करणाऱ्या कंंपन्या व कृषी केंद्रामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून कृषी विभाग याकडे डोळेझाक करीत आहे. या कृषी केंद्र चालकांना कृषी विभागाचा आशीर्वाद असल्याचा आरोपही शिरभैये यांनी केला आहे. या प्रकरणी ग्राहक संरक्षण मंचाकडे दाद मागणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)