शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
2
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
3
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
4
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
5
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
6
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
7
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
8
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
10
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
11
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
12
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
13
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
14
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
15
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
16
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
17
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
18
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
20
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम

आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 23:40 IST

ब्रह्मपुरी महोत्सवाच्या दुसºया दिवशी महिला कॅन्सर आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

ठळक मुद्देब्रह्मपुरी महोत्सव : होम मिनिस्टर कार्यक्रमात महिलांचा सहभाग

ब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी महोत्सवाच्या दुसºया दिवशी महिला कॅन्सर आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याच दिवशी युवकांसाठी आयोजित मोटीवेशनल प्रोग्राम व खास महिलांसाठीच्या होम मिनिस्टरने महोत्सवाला रंगत आली.पंचशिल वसतिगृहाच्या पटांगणावर आरोग्य शिबिराचे उद्घाटन आरोग्य विभाग नागपूरचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांनी केले. अध्यक्षस्थानी आ. विजय वडेट्टीवार होते. अतिथी म्हणून आयएमएचे तालुका अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत लाडूकर, डॉ. प्रशांत लोडे, डॉ. शीतल कांबळे, डॉ. प्रितमकुमार खंडाळे उपस्थित होते. मॅमोग्रामीसाठी नागपूरवरून मशिन आणली. शिबिरात ७४० रुग्णांची तपासणी केली. यात २७ रुग्ण कॅन्सरबाधित आढळली. पुढील उपचार करण्यात येणार असल्याचे आयोजक आ. वडेट्टीवार यांनी सांगितले. सिंदेवाही, मूल, आरमोरी, पाथरी, नागभीड, वडसा, ब्रह्मपुरी, सावली आदी भागातून रुग्णांनी हजेरी लावली होती. शिबिराची जबाबदारी डॉ. सतीश कावळे, सतीश तुंडूलवार, विरभद्र कोट्टरवार, महेश भर्रे, वखार खान, राकेश पडोळे, अनिल वनकर यांनी पार पाडली. दुसºया सत्रात युथ मोटीवेशनल कार्यक्रमात शेकडो युवकांना स्पर्धा परीक्षा, व्यक्तिमत्व विकास यावर प्रशांत वावगे, एसडीपीओ प्रशांत परदेसी, डिएफओ कुलराज सिंग यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी प्रा. देवेश कांबळे, होम मिनिस्टरसाठी स्मिता शेवाळे यांच्या उपस्थितीत महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी रेश्मा लाखानी, किरण वडेट्टीवार, रश्मी पेशने, प्रतिभा फुलझेले उपस्थित होते. यावेळी कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी उसळली होती.