शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरातील स्पीडब्रेकर जीवघेणे

By admin | Updated: January 4, 2015 23:10 IST

अपघात टाळण्यासाठी गर्दीच्या मार्गावर गतिरोधक तयार करण्यात येतात. चंद्रपुरातही ते तयार करण्यात आले. मात्र वाहनांची गती कमी करण्यासाठी तयार करण्यात आलेले हे गतीरोधक चंद्रपूरकरांसाठी धोकादायक ठरत आहेत.

संतोष कुंडकर - चंद्रपूरअपघात टाळण्यासाठी गर्दीच्या मार्गावर गतिरोधक तयार करण्यात येतात. चंद्रपुरातही ते तयार करण्यात आले. मात्र वाहनांची गती कमी करण्यासाठी तयार करण्यात आलेले हे गतीरोधक चंद्रपूरकरांसाठी धोकादायक ठरत आहेत. रस्त्यांची दुर्दशा आणि धूळ या दोहोंमुळे वैतागलेल्या चंद्रपूरकरांच्या सोयीसाठी महानगरपालिकेने मुख्य मार्गाचे डांबरीकरण केले, तर शहरातील विविध भागात सिमेंटचे रस्ते तयार केलेत. शहरवासीयांना खड्ड्यांच्या डोकेदुखीतून मुक्ती मिळाली असली तरी नव्याने तयार करण्यात आलेल्या उंच गतिरोधकांनी वैताग वाढविला आहे. या मागील उद्देश चांगला असला तरी गतिरोधक तयार करताना कोणताही विचार करण्यात आलेला नाही. काही रस्त्यांवरील गतिरोधक इतके उंच आहेत की, त्यावरून जाताना वाहनधारकाची लहानशी चूकही त्याच्या जीवावर बेतू शकते. एखादे वाहन वेगाने येत आहे आणि त्याला गतिरोधक दिसले नाही, तर त्या उंच गतिरोधकावरून वाहन उसळून अपघाताचीच शक्यता अधिक आहे. तसे अपघातही या गतिरोधकांमुळे झाले आहेत. आझाद बाग आणि हिंदी सिटी हायस्कूल याच्या मधून जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या दोनही टोकाला सिमेंट रस्त्यावर गतिरोधक तयार करण्यात आले आहेत. हे गतिरोधक इतके उंच आहेत की, लहान वाहने त्याच्यावरून नेल्यास गतीरोधकाला वाहने घासून वाहनांचे नुकसान होत आहे. त्याच्या खुणाही गतीरोधकावर स्पष्ट दिसतात. पश्चिम दिशेने येणाऱ्या वाहनधारकाला हिंदी सिटी हायस्कूल समोरील गतीरोधक अनेकदा दिसत नाही. त्यामुळे या ठिकाणी वारंवार वाहने उसळत आहेत. किरकोळ अपघातही घडत आहेत. केवळ याच मार्गावर नाही तर शहरातील अनेक सिमेंट रस्त्यावर अशी परिस्थिती आहे. (प्रतिनिधी)