शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

वॉर्डावॉर्डात नवरात्रोत्सवाच्या तयारीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 22:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : गणरायाला निरोप दिल्यावर आता ग्रामीण भागासह शहरातील वॉर्डावॉर्डात सर्वत्र नवरात्रोत्सवाची तयारी जोमात सुरू झाली ...

ठळक मुद्देमूर्तिकार व्यस्त : मंडळांकडून नियोजन सभा, सुटीच्या दिवशी वर्गणी गोळा करण्यावर भर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गणरायाला निरोप दिल्यावर आता ग्रामीण भागासह शहरातील वॉर्डावॉर्डात सर्वत्र नवरात्रोत्सवाची तयारी जोमात सुरू झाली आहे. त्यातही चंद्रपूर शहरात असलेल्या मंडळांची लगबग वाढली आहे. गणरायाला निरोप देऊ न मूर्तीकार आता दुर्गामातेच्या मूर्ती साकारण्यात व्यस्त झाले आहे. तर मंडळांकडून मंडप उभारणीचे तसेचवर्गणी गोळा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. येत्या २९ तारखेला मातेचे आगमन होणार असल्याने सर्वानाच तिच्या आगमनाची प्रतिक्षा लागली आहे.दरवर्षी चंद्रपूर जिल्ह्यात नवरात्रोत्सव थाटात साजरा केला जातो. त्यातही विशेष म्हणजे, चंद्रपूर शहरात नवरात्रोत्सवाची धूम असते. यामुळेच प्रत्येक जण नवरोत्रोत्सवाची आतुरतेने वाट बघत असतो. नवरात्रोत्सवाच्या काळात नऊ दिवसात शहर गजबलेले असते. शिवाय नऊ दिवस दुर्गामाता विराजमान राहत असल्यने हे दिवस नवचैतन्याने भरलेली असतात.येत्या २९ तारेखेला घटस्थापना असून तिचे आगमन होणार असल्याने मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकत्यांची धावपड सुरू झाली आहे. आपले मंडप वेगळे व आकर्षक असावे यासाठी मंडप उभारणीचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. त्यातही येथील काही मंडळांच्या उत्सावाची ख्याती असल्याने त्यांचे काम जोमता सुरू आहे. मूर्तीकारही घेतलेल्या आॅर्डरच्या मूर्ती तयार करण्यासाठी आपल्या परिवारासह सध्या व्यस्त आहेत. मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उत्सवाच्या तयारीसाठी कामाला लागले आहेत. सुटीचा दिवस बघून मंडळाचे सदस्य वर्गणी गोळा करीत आहेत. विशेष म्हणजे, बहुतांश वार्डामधील दुर्गा तसेच शारदा मंडळ महिलांचे असल्याने त्यांची तयारी वाखान्याजोगी आहे. बैठका घेऊन नियोजन केले जात असून प्रशासकीय स्तरावर विविध परवानगी सुद्धा घेतली जात आहे.बंगाली कॅम्प परिसरातदुर्गा मातेच्या मूर्ती शहरातील बरेच मूर्तिकार बनवतात. मात्र बंगाली कॅम्प परिसरातील मूर्ती बघण्यासाठी नागरिकांची गर्दी असते. या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो. त्याचप्रमाणे शहरातील इतर भागातही मोठ्या संख्येने मंडळ असून मंडळाच्या माध्यमातून उत्सव साजरा केला जातो. शहरातील काही भागामध्ये दांडिया स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे.साहित्यांची दुकाने सजलीदुर्गा, शारदा मातेच्या श्रृंगारासाठी लागणारे दागिने, शस्त्र व अन्य साहित्यांची दुकान सज्ज झाली आहेत. आता काही दिवस मातेच्या आगमणासाठी उरलेले असल्याने व ऐनवेळी धावपळ होऊ नये यासाठी मंडळांकडून साहित्याची खरेदी केली जात आहे. त्यामुळे दुकानदारांनी मातेला लागणारे साहित्य मागवून ठेवले असून दुकान सज्ज करून ठेवले आहे. यामुळेच दुकानात आतापासून गर्दी बघायला मिळत आहे.

टॅग्स :Navratriनवरात्री