शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

खड्डे खोदण्याच्या कामाला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 00:12 IST

३३ कोटी वृक्ष लागवडीमध्ये सर्वाधिक वाटा चंद्रपूर जिल्ह्याचा असेल, या पद्धतीचे नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी अधिकाऱ्यांना दिले. सध्या या वृक्ष लागवडीसाठी जिल्ह्यात विविध विभागाच्या वतीने खड्डे खोदण्याचे काम सुरू आहे.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांनो, गतिशील व्हा : ३३ कोटी वृक्षलागवडीत जिल्हा राहणार अग्रणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ३३ कोटी वृक्ष लागवडीमध्ये सर्वाधिक वाटा चंद्रपूर जिल्ह्याचा असेल, या पद्धतीचे नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी अधिकाऱ्यांना दिले. सध्या या वृक्ष लागवडीसाठी जिल्ह्यात विविध विभागाच्या वतीने खड्डे खोदण्याचे काम सुरू आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले असून जो विभाग यात मागे आहे, त्यांनी मे महिन्याच्या अखेरपर्यंत खड्डे पूर्ण करावे, असे निर्देशही जिल्हाधिकाºयांनी दिले. यावेळी वृक्षलागवडीची प्रक्रिया व खड्ड्यांची सद्यस्थिती जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेतली.जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात या संदर्भात बैठक झाली. वनविभागाने या संदर्भात एक प्रणाली विकसित केली असून यामध्ये प्रत्येक घटनेची नोंद केली जाणार आहे.आजच्या बैठकीमध्ये वनविभाग चंद्रपूर, ब्रह्मपुरी, सामाजिक वनीकरण विभाग, वन्यजीव विभाग, वनविकास महामंडळाचे अधिकारी, वेगवेगळ्या प्रकल्पाचे कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, जिल्हा प्रशासकीय अधिकारी, महानगरपालिका आयुक्त, अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम पाटबंधारे विभाग, अधीक्षक अभियंता व वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी उपस्थित होत. या बैठकीत दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विविध विभागांनी आतापर्यंत किती खड्डे तयार केले, त्याबद्दल आढावा घेण्यात आला. या बैठकीला मुख्य वनसंरक्षक एस. व्ही. रामाराव, महानगरपालिका आयुक्त संजय काकडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, विभागीय वन अधिकारी तथा ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेचे मुख्य संयोजक अशोक सोनकुसरे, एस. खरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय जयस्वाल, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, सहाय्यक अभियंता रवींद्र हजारे, इतर विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.ग्रामपंचायतस्तरावर व्याप्ती वाढवाजिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपंचायती, नगरपरिषद व ग्रामपंचायत स्तरावरील नियोजन वेळेत पूर्ण होईल, याबाबत सर्व विभाग प्रमुखांनी प्रयत्न करण्याचे निर्देश यावेळी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिले. जिल्हा परिषद व ग्रामपंचायतस्तरावर या उपक्रमाची व्याप्ती वाढली पाहिजे, मोठया प्रमाणात वृक्ष लागवड झाली पाहिजे, असे निर्देशही त्यांनी दिले.राज्यभरातील जाणून घेतली स्थितीया बैठकीच्या पूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा झाली. ही चर्चा विविध मुद्यांवर व सखोल करण्यात आली. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये वृक्षारोपणाच्या संदर्भात काय तयारी सुरु आहे, याबद्दलचा आढावा घेत जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी तेथील स्थिती जाणून घेतली.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीforest departmentवनविभाग