शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पायलट बंधाऱ्यामुळे आठशे हेक्टर शेतात होणार दुबार पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 13:06 IST

मूल तालुक्यातील जानाळा-पोंभुर्णा मार्गावरील चिरोली-सुशी गावाच्या मध्यभागी असलेल्या नदीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने केवळ सहा महिण्यात नविन पायलट बंधाऱ्याचे बांधकाम पूर्ण केले.

ठळक मुद्देमूल-चिरोली परिसरातील शेतकऱ्यांना नवसंजीवनी सहा महिन्यात बंधाऱ्याचे काम पूर्ण

भोजराज गोवर्धनलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मूल तालुक्यातील जानाळा-पोंभुर्णा मार्गावरील चिरोली-सुशी गावाच्या मध्यभागी असलेल्या नदीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने केवळ सहा महिण्यात नविन पायलट बंधाऱ्याचे बांधकाम पूर्ण केले. या बंधाऱ्यात सुमारे साडेपाच किमी अंतरापर्यंत पाण्याचा संचय करण्यात आला आहे. त्यामुळे चिरोली परिसरातील सुमारे आठशे हेक्टर शेतात रब्बी पिकांची लागवड करता येणार आहे. त्यामुळे हा बंधारा चिरोली परिसरातील शेतकऱ्यांना नवसंजीवनी मिळणार आहे.मूल तालुक्यातील जानाळा-पोंभुर्णा मार्गावरील चिरोली ते सुशीच्या मध्यभागातून अंधारी नंदीचा मोठा प्रवाह वाहतो. येथे ९० मीटर लांब असलेल्या मोठ्या पुलाचे बांधकाम सन २०१५-२०१६ या वर्षात पूर्ण करण्यात आले. अंधारी नंदीच्या दोन्ही बाजुला शेती आहे. मात्र नदीतील पाणी केवळ खरीप हंगामात होते. त्यामुळे माजी पालकमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी चांदा ते बांधा योजनेतंर्गत १९३.३१ लाख रूपयांची प्रशासकीय मान्यता प्राप्त करून दिली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता प्रशांत वसुले, शाखा अभियंता रूपेश बोदडे यांनी अथक परिश्रम घेत जानेवारी २०१९ पासून कामाला सुरुवात केली. सुमारे ९० मीटर लांब असलेल्या या बंधाऱ्याची उंची ३.५० मीटर असून ३.९३ लाख घनमीटर या बंधाऱ्यायाची साठवण क्षमता आहे. त्यामुळे बंधाऱ्याचे पाणी सुमारे साडेपाच किमी अंतरापर्यत साठवणूक करता येते. त्यामुळे चिरोली, केळझर, सुशी, महादवाडी व परिसरातील शेतकऱ्यांना या बंधाऱ्यातील पाण्याचा लाभ घेता येणार आहे.सदर बंधाऱ्यातील पाणी जवळ असलेल्या चार मामा तलावात सौर उर्जेच्या माध्यमातून सोडण्यात येणार आहे. तसेच या चार तलावातील पाणी इतर पाच मामा तलावात सोडण्यात येणार आहे. त्यामुळे परिसरातील सुमारे आठशे हेक्टर शेतामध्ये दुबार पेरणी करता येणार आहे. बधाऱ्याचे काम जलदगतीने पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातील निवृत्त सचिव प्रमोद बोंगीरवार, व्ही. एन. आय. टी. महाविघ्यालय नागपूरचे प्रा. डॉ. इंगडे, तत्कालीन कार्यकारी अभियंता मनोजकुमार जयस्वाल आदींनी प्रयत्न केले.मूलमध्ये पाच बंधारे प्रस्तावीतमूल तालुक्यातील चिरोली येथे एक कोटी ९१ लाखांचा पायलट प्रकल्प सहा महिण्यात पूर्ण करण्यात सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना यश आहे आहे, यामुळेच आता ताडाळा येथे पूल आणि बंधाऱ्यांसाठी १४ कोटी ९० लाख, चिमढा येथे नऊ कोटी ९० लाख, नलेश्वर येथे सहा कोटी, सिंतळा येथे १७ कोटी ९० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.सिंचनाची अपुरी व्यवस्था असलेल्या चिरोली परिसरात शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेले पायलट प्रकल्पाचे बांधकाम केवळ सहा महिन्यात पूर्ण झाले. या प्रकल्पातील पाणी शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी कामात येणार आहे.-प्रशांत वसुले उपविभागीय अभियंता

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प