शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
3
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
4
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
5
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
6
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
7
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
8
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
9
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
10
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
11
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
12
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
13
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
14
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
15
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
16
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
17
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
18
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
19
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
20
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र

१२७० हेक्टरवर होणार सोयाबिनचे ग्राम बिजोत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 23:17 IST

मागील खरीप हंगामात जिल्ह्यामध्ये कपाशीचा पेरा वाढला होता. मात्र बोंड अळीच्या प्रार्दूभावामुळे पिकाचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी कपाशी कमी करून सोयाबिन पेरा वाढवावा, यासाठी यंदा तब्बल एक हजार २७० हेक्टरवर सोयाबिनचे ‘ग्राम बिजोत्पादन’ करण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला. योजनेतील सहभागी शेतकऱ्यांना शासनाकडून प्रती क्विंटलमागे १७०० रुपये अनुदान दिले जाईल.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना मिळणार अनुदान : बियाण्यांची टंचाई होणार दूर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील खरीप हंगामात जिल्ह्यामध्ये कपाशीचा पेरा वाढला होता. मात्र बोंड अळीच्या प्रार्दूभावामुळे पिकाचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी कपाशी कमी करून सोयाबिन पेरा वाढवावा, यासाठी यंदा तब्बल एक हजार २७० हेक्टरवर सोयाबिनचे ‘ग्राम बिजोत्पादन’ करण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला. योजनेतील सहभागी शेतकऱ्यांना शासनाकडून प्रती क्विंटलमागे १७०० रुपये अनुदान दिले जाईल. शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिल्यास पुढील खरीप हंगामात सोयाबिन बियाण्यांची टंचाई भासणार नाही.केंद्र शासनाच्या कृषी विस्तार व तंत्रज्ञान अभियान (एमएमएईटी) तसेच बियाणे, लागवड साहित्य उपअभियानांअतर्गत (एसएमएसपी) ग्राम बिजोत्पादन करण्याची मोहीम जिल्ह्यात मागील वर्षी राबविण्यात आली होती. परंतु, लागवडीचे उद्दिष्ट कमी मिळाल्याने शेतकऱ्यांनी फारसा प्रतिसाद दिला नाही. शेतकऱ्यांना उत्तम प्रतीचे बियाणे मिळावे, यासाठी खासगी कंपन्यांकडे धाव घेण्याची गरज उरणार नाही हा अभियानाचा मुख्य हेतू आहे. सर्वच तालुकयात अभियानाची सुरुवात झाली होती. मागील वर्षी राज्यातील २२ जिल्ह्यामध्ये दोन लाख १४ हजार हेक्टर क्षेत्रावर ग्राम बिजोत्पादन झाले. जिल्ह्यासाठी उद्दिष्ट कमी मिळाल्याने अनेक शेतकरी सहभागी होऊ शकले नाही. त्यामुळे ग्राम बिजोत्पादन मोहिमेअंतर्ग उत्तम दर्जाचे बियाणे मिळणे कठीण झाले होते. दरम्यान कृषी विभागाने मोहिमेची व्याप्ती वाढवून यंदाच्या खरीप हंगामात १२७० हेक्टर क्षेत्रावर वाढविण्याचा निर्णय घेतला. संबंधित अधिकारी व महाबीजचे पथक योजनेची माहिती शेतकºयांना देण्याचे नियोजन केले. काही तालुक्यांतील शेतीच्या बांधावर जावून योजनेत सहभागी होण्याचे सांगितले जात आहे. शेतकºयांचा मोहिमेत सहभाग वाढला तर सोयाबिनचे दर्जेदार बियाणे विकत घेण्यासाठी कंपन्यांवर अवलंबून राहण्याची वेळ येणार नाही. दरम्यान जिल्ह्यात मृगाचा पाऊस बरसला. शेतकरी पेरणीपूर्वीची कामे करीत आहेत. बियाणे व खताची जुळवाजुळव करण्यासाठी लगबग सुरू असल्याचे दिसून येते. ग्राम बिजोत्पादन मोहिमेत प्रती हेक्टर १७०० रुपये अनुदान मिळत असल्याने यंदा लागवड क्षेत्र वाढण्याची आशा निर्माण झाली आहे.महाबीज देणार बियाणे, प्रशिक्षणग्राम बिजोत्पादन मोहिमेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना महाबीजकडून सोयाबिन बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रती लाभार्थी एक एकर क्षेत्रामध्ये बियाण्यांची लागवड करता करता येईल. यासाठी संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून परवानगी घेवून मोहिमेत सहभागी होता येईल. बियाण्यांची लागवड केल्यानंतर पीक फुलोऱ्यावर आले असता महाबीजच्या वतीने शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येईल.बोगस बियाण्यांना प्रतिबंधयोजनेतील सहभागी शेतकऱ्यांना प्रति क्विंटल १७०० रुपये अनुदान देण्यात येईल. सोयाबिन बियाणे पुढील हंगामात वापरण्यासाठी ग्राम बिजोत्पादन या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला मार्गदर्शन केले जाणार आहे. बियाण्यांची टंचाई निर्माण होऊ नये. शिवाय खासगी कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या माथी बोगस बियाणे मारू नये याकरिता मोहिमेत सहभागी होण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी प्रयत्नशिल आहेत.