शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

दोनशे मुलांना अत्याधुनिक प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 00:36 IST

मत्स्य व्यवसायासंदर्भात चंद्रपूरमध्ये राज्य शासनामार्फत सुरू असलेल्या वेगवेगळ्या उपाययोजनांना अधिक गतीशील करण्यात येईल. त्यातून राज्याच्या पूर्व भागात गोडया पाण्यात मत्स उत्पादनात अग्रेसर असणाऱ्या भोई समाजाला अधिक सशक्त करण्यात येईल.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : भोई समाजाच्या मत्स्य व्यवसायाला गतीशील करणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मत्स्य व्यवसायासंदर्भात चंद्रपूरमध्ये राज्य शासनामार्फत सुरू असलेल्या वेगवेगळ्या उपाययोजनांना अधिक गतीशील करण्यात येईल. त्यातून राज्याच्या पूर्व भागात गोडया पाण्यात मत्स उत्पादनात अग्रेसर असणाऱ्या भोई समाजाला अधिक सशक्त करण्यात येईल. त्यासाठी समाजातील २०० मुलांच्या आधुनिक प्रशिक्षणाबाबत शासन स्तरावर विचार करण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे वित्त नियोजन व वने मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवारी शिष्टमंडळाला दिले.जिल्ह्यातील पारंपारिक मत्स्यव्यवसायाला आपल्या कष्टाने जपणाऱ्या भोई समाजाच्या एका शिष्टमंडळाने विविध मागण्यांसाठी शनिवारी रात्री ना. सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली. नियोजन भवनात या समाजाच्या मान्यवरांनी आपल्या विविध समस्या त्यांच्यापुढे मांडल्या. यावेळी वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, आ. नाना श्यामकुळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल पावडे , डॉ. दिलीप शिवरकर, बंडू हजारे, नगरसेवक राजीव गोलीवार, अरूण तिखे यांच्यासह भोई समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.या बैठकीमध्ये या समाजाच्या विविध संस्थांच्या संदर्भातील कामकाजाचा आढावा सादर करण्यात आला. जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या मत्स्यव्यवसायाच्या संदर्भातील शासकीय प्रयत्न व त्याला मिळणारा प्रतिसाद यावरही चर्चा झाली. भोई समाजाच्या मासेमारी संदर्भातील शीर्ष संस्थांना कार्यालय स्थापनेबाबत मदत करणे, कौशल्य विकास विभागांतर्गत त्यांना मदत करणे, यासंदर्भात चर्चा झाली. मासेमारीच्या अत्याधुनिक प्रशिक्षणासोबतच मत्स्य निर्मिती आणि संगोपनाबाबतही आधुनिक तंत्रज्ञानाने स्थानिक भोई समाजाला अधिक प्रगत करण्याबाबत काही मागण्या पुढे आल्या. राज्य शासन मत्स्यव्यवसायाच्या प्रगतीसाठी आग्रही असून राज्याला लाभलेल्या विपुल समुद्र किनाºयासोबतच चंद्रपूर, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये असणारऱ्या पारंपारिक तलावातील मच्छीमारीमुळे राज्याच्या मत्स्य व्यवसायात भर पडत असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी मुंबईमध्ये मच्छीमारी व्यवसायाची जुळलेल्या अनेक समाजाने या व्यवसायात मारलेल्या भरारीबाबत शिष्टमंडळाला अवगत केले.यावेळी त्यांनी प्रशिक्षणासंदर्भात २६ एप्रिलला बैठक लावण्यात येत असल्याचे सांगितले.१६ हजार मेट्रिक टन उत्पादन अपेक्षितराज्यात समुद्र किनाऱ्याच्या मच्छीमारीनंतर पूर्वेकडील चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यात तलावाच्या पाण्यामध्ये मासेमारी करण्याचा मोठ्या प्रमाणात उद्योग होतो. एकट्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सरासरी ९ हजार २०३ मेट्रीक टन मत्स्योत्पादन सध्या होत आहे. जिल्ह्याने १३ हजार ३३६ मेट्रिक टन उद्दिष्ट घेतले आहे. जिल्ह्यामध्ये ५० टक्के जनता मांसाहारी आहे. त्यामुळे जवळपास १६ हजार मेट्रिक टनावर मासोळीचे उत्पादन अपेक्षित आहे, असेही यावेळी ना. सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.