शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

अंबुजा प्रकल्पग्रस्तांची सोनापूर ते चंद्रपूर पदयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 23:53 IST

अंबुजा कंपनीकडून होत असलेल्या अन्याय आणि फसवणुकीच्या विरोधात प्रकल्पग्रस्तांनी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष पप्पु देशमुख यांच्या नेतृत्वात सोनापूर ते चंद्रपूर अशा पदयात्रेला मंगळवारी सुरूवात केली. या पदयात्रेचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले.

ठळक मुद्देप्रहार संघटनेचे नेतृत्व : आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार

आॅनलाईन लोकमतगडचांदूर : अंबुजा कंपनीकडून होत असलेल्या अन्याय आणि फसवणुकीच्या विरोधात प्रकल्पग्रस्तांनी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष पप्पु देशमुख यांच्या नेतृत्वात सोनापूर ते चंद्रपूर अशा पदयात्रेला मंगळवारी सुरूवात केली. या पदयात्रेचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले. मंगळवारी राजुरा एसडीओ कार्यालयासमोर धरणे देवून ही पदयात्रा बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.सोनापूरवरुन जयघोषात निघालेल्या पदयात्रेचे दुपारी गडचांदुरात माजी जि. प. सभापती अरुण निमजे यांनी स्वागत केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते मनोज भोजेकर उपस्थित होते. त्यानंतर राजुरा येथे पदयात्रा पोहचताच भवानी मंदिर संस्थान, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, आॅटो चालक-मालक संघटना, बार असोसिएशन, गुरुदेव सेवा मंडळ, संघर्ष गृप व टैक्सी चालक-मालक संघटना यांच्याकडूनही स्वागत करण्यात आले. या पदयात्रेचा बोंडे मंगल कार्यालयात आज मुक्काम असून बुधवारी राजुरा येथून ही पदयात्रा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.अंबुजा प्रकल्पग्रस्तांनी प्रहार संघटनेच्या नेतृत्वात २० जानेवारीपासून चंद्रपुरात बेमुदत उपोषण सुरु केले आहे. परंतु, उपोषणाची अजुनही दखल घेण्यात आली नाही. उलट दबावतंत्राचा प्रयोग होत असल्याने प्रहारने पदयात्रा काढली आहे. अंबुजा प्रकल्पाकरिता १९९९ मध्ये ५२० प्रकल्पग्रस्त शेतकºयांची १२२६ हेक्टर जमीन अधिग्रहीत करण्यात आली. परंतु, कित्येक प्रकल्पग्रस्तांना अजुनही स्थायी नोकरी आणि योग्य मोबदला दिला नाही. याच अन्यायाविरोधात आंदोलन सुरू करण्यात आले आहे.