शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय महाविद्यालयातील पाणीपुरवठा प्रश्न निकाली काढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2021 05:00 IST

वैद्यकीय महाविद्यालयाचे दोन्ही टप्पे पूर्ण झाल्यानंतर ०.९ एमएलडी पाण्याची गरज राहणार आहे. त्यापैकी ०.३ एमएलडी पाणी प्रक्रिया करून वापरण्यायोग्य करणार आहे. त्यामुळे या व्यतिरिक्त पाणी ०.६ एमएलडी लागणार आहे, अशी माहिती जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली. जीवन प्राधिकरण विभागाने या आधी वैद्यकीय महाविद्यालयाला पत्र लिहून या सर्व सर्वेक्षणासाठी पाच लाख देण्याबाबत विनंती केली. वैद्यकीय महाविद्यालयाने याबाबत दखल घेण्याच्या सूचना आ. मुनगंटीवार यांनी केल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पाणीपुरवठा व नवीन वीज जोडणीचा प्रश्न जीवन प्राधिकरण, मनपा व महावितरणने निकाली काढावा, अशी सूचना विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी शासकीय विश्रामगृहातील आढावा बैठकीत दिले. वैद्यकीय महाविद्यालयाला बोअरवेल, मनपा, मजिप्राद्वारे पाणीपुरवठा होऊ शकतो. सध्या चार बोअरवेल परिसरात उपलब्ध आहेत. ज्यामुळे बांधकामाची प्रक्रिया व्यवस्थित सुरू आहे. वैद्यकीय महाविद्यालयाचे दोन्ही टप्पे पूर्ण झाल्यानंतर ०.९ एमएलडी पाण्याची गरज राहणार आहे. त्यापैकी ०.३ एमएलडी पाणी प्रक्रिया करून वापरण्यायोग्य करणार आहे. त्यामुळे या व्यतिरिक्त पाणी ०.६ एमएलडी लागणार आहे, अशी माहिती जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली. जीवन प्राधिकरण विभागाने या आधी वैद्यकीय महाविद्यालयाला पत्र लिहून या सर्व सर्वेक्षणासाठी पाच लाख देण्याबाबत विनंती केली. वैद्यकीय महाविद्यालयाने याबाबत दखल घेण्याच्या सूचना आ. मुनगंटीवार यांनी केल्या. यावेळी जि. प. अध्यक्ष  संध्या गुरनुले, भाजप जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर राखी कंचर्लावार, डॉ. मंगेश गुलवाडे, अधिष्ठाता डॉ. नितनवरे, आयुक्त राजेश मोहीते आदी उपस्थिती होते.

पहिल्या टप्प्यासाठी ६० लाख- महाविद्यालयाच्या नवीन विद्युत कनेक्शनसंदर्भात २२.९४ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक महावितरण कंपनीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला या आधीच दिले आहे, परंतु हे कनेक्शन दोन सोर्समधून हवे असल्याने पहिल्या टप्प्यासाठी ९.३ कोटी रु. मंजूर करावे, असेही बैठकीत ठरले. त्याचप्रमाणे बे- कंस्ट्रक्शनसाठी पहिल्या टप्प्यासाठी ६० लाख रुपये याचबरोबर देण्यात यावे असे ठरले. 

 

टॅग्स :WaterपाणीSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार