शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
2
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
3
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
4
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
5
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
6
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
7
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
8
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
9
कुजबुज: मोहित कंबोज यांचा खरंच संन्यास की प्रसिद्धीसाठी स्टंट? ‘उँचे लोग, उँची पसंद’, पण...
10
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
11
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
12
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
13
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
14
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
15
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
16
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
17
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
18
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
19
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
20
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात

घनकचरा प्रकल्प जागेच्या वादात अडकला

By admin | Updated: July 5, 2014 01:19 IST

घनकचरा व्यवस्थापन व प्रकल्प निर्मितीचे ग्रहण मागील अनेक वर्षांपासून सुटता सुटत..

चंद्रपूर: घनकचरा व्यवस्थापन व प्रकल्प निर्मितीचे ग्रहण मागील अनेक वर्षांपासून सुटता सुटत नसल्याचे दिसते. नागपूर येथील मे. कन्यका नॉन कन्व्हेशनल एनर्जी प्रा. लि. या कंपनीला या प्रकल्प निर्मितीचे कंत्राट दिले आहे. कंत्राट देताना प्रारंभी सात एकर जागा रिकामी व साफ करून देण्याचे ठरविण्यात आले होते. मात्र सदर जागाच उपलब्ध करून दिली नसल्याचे कारण पुढे करून या कंपनीने काम सुरू केले नाही तर महापालिका जागा साफ करून दिल्याचेच सांगत आहे. जागेच्या या वादात हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मात्र अडला आहे. विशेष म्हणजे, प्रकल्पच सुरू होऊ न शकल्यामुळे सुमारे पाच लाख टन कचरा डम्पींग यार्डवर पडून आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहे. केव्हाही पाऊस येण्याची शक्यता आहे. या कचऱ्यामुळे पावसाळ्यात जलप्रदूषणाचाही धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. चंद्रपुरातून दररोज १३० ते १४० टन कचरा निघतो. एवढ्या मोठ्या प्रमाणात घनकचरा बाहेर पडत असतानाही चंद्रपुरात आजवर घनकचरा प्रकल्प उभा होऊ शकला नाही. याशिवाय घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाबाबतही चंद्रपूर दुर्देवीच ठरले. चंद्रपूरमध्ये नगरपालिका अस्तित्वात असताना घनकचरा व्यवस्थापनाचे धिंडवडेच उडाले होते. त्यानंतर आता मागील वर्षी नागपूर येथील मे. कन्यका नॉन कन्व्हेशनल एनर्जी प्रा. लि. या कंपनीला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प निर्मितीचे कंत्राट देण्यात आले. ३१ मे २०१३ रोजी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत ठराव क्रमांक ४२ नुसार २३० रुपये प्रति टन या हिशेबाने घनकचरा प्रकल्पाचे कंत्राट मे. कन्यका नॉन कन्व्हेशनल एनर्जी प्रा. लि. या कंपनीला देण्यात आले.४ जून २०१३ रोजी वर्क आर्डरही देण्यात आला. यावेळी कारखाना उभारणीसाठी किमान सात एकर जागा कंत्राटी कंपनीला उपलब्ध करून देण्याचा करार झाला होता. ही जागा साफ करून त्याचे सपाटीकरणही करण्यात येणार होते. यातील तीन एकर जागा साफ करून दिल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात येते. मात्र प्रत्यक्षात मनपाने ही जागाच उपलब्ध करून दिली नसल्याचे मे. कन्यका नॉन कन्व्हेशनल एनर्जी प्रा. लि.चे संचालक विजय भांडारवार यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. याबाबत त्यांनी अनेकदा महापालिकेकडे पत्र पाठवून लक्ष वेधले. मात्र मनपाने त्यांच्या पत्रव्यवहाराकडे लक्षच दिले नसल्याचेही त्यांनी सांगितले. कारखान्यासाठी अनेक मशनरीज कन्यका कंपनीने दिल्लीतून तयार करवून घेतल्या आहेत. यात सदर कंपनीने कोट्यवधी रुपये लावले आहे. या सर्व मशनरीज चंद्रपूरला ट्रान्सपोर्ट करण्यासाठी केव्हाही तयार आहेत, असेही भांडारवार यांनी सांगितले.विशेष म्हणजे, जागेच्या या वादात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प मात्र अडून पडला आहे. आतापर्यंत कारखान्याचे काम सुरू होणे अपेक्षित असताना एक वर्षानंतर कामाचा शुभारंभही झालेला नाही. (शहर प्रतिनिधी)