तळोधी-गंगासागर हेटी, ऊश्राळ मेंढा, आकापूर हा एकमेव रहदारीचा मार्ग काही महिन्यांपूर्वी पूर्णतः उखडलेला होता. सततच्या पाठपुराव्याने मार्गांवर डांबरीकरण करण्यात आले. डांबरीकरणानंतर मार्गाच्या दोन्ही मुरुम टाकण्यात आले नव्हते. यासाठी ऊश्राळ मेंढा, गंगासागर हेटी, आकापूर या तिन्ही ग्रामपंचायतींच्या सरपंच व ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याला निवेदन दिले. त्यानंतर मुरुम पसरविण्यात आले. योग्यरीत्या मुरुमाचा भरणा करण्यात आला नसल्याने रस्ता अरुंद झाला. या ठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढले. उर्वरित रस्त्यावर आता मुरुमाऐवजी पांढरी माती टाकण्यात येत आहे.
कोट :
मुरुमाऐवजी माती टाकण्यात आल्याने तळोधी-गंगासागर हेटी रस्त्यावर छोटे-मोठे अपघात झाले आहेत. काही दिवसांपूर्वी एका शेतकऱ्याचा ट्रॅक्टर रस्त्याच्या खाली कोसळला होता. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष द्यावे.
- हेमराज लांजेवार, जिल्हाध्यक्ष, सरपंच सेवा महासंघ, चंद्रपूर.