शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वरोरा येथे भोई समाजाचा समाज प्रबोधन मेळावा

By admin | Updated: September 28, 2016 00:54 IST

भोई समाजाला केंद्र व राज्य शासनाच्या विविध क्षेत्रात सवलती आहेत. त्या सवलतीचा लाभ युवक-युवतींनी घेतला पाहिजे.

हजारो समाज बांधवांची उपस्थिती : महर्षी वाल्मिकी यांच्या मंदिराच्या जागेचेही भूमिपूजन वरोरा : भोई समाजाला केंद्र व राज्य शासनाच्या विविध क्षेत्रात सवलती आहेत. त्या सवलतीचा लाभ युवक-युवतींनी घेतला पाहिजे. शिक्षण क्षेत्रात समाजातील युवा वर्गाने एक पाऊल पुढे टाकून सवलतीचा फायदा घ्यावा. भोई समाज सोसायटी निर्माण करून छोटेमोठे उद्योग निर्माण करावे. यातून युवकांनी रोजगार उपलब्ध करून घेतले तर कोणीही बेरोजगार राहणार नाही. शहर व ग्रामीण भागातील भोई समाज बांधवांना संघटित करून समाज प्रबोधन मेळावे घेऊन समाजाला मार्गदर्शन करणे काळाची गरज आहे. संस्था व पदाधिकाऱ्यांनी ही जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन कृष्णाजी नागपुरे यांनी केले.वरोरा येथील साई मंगल कार्यालयात शनिवारी आयोजित समाजप्रबोधन मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून नागपुरे बोलत होते. यावेळई मंचावर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा उपाध्यक्ष सदाशिव पचारे, कोषाध्यक्ष देवराव पिंपळकर, सचिव रमेश नागपुरे, कर्मचारी संघटना अध्यक्ष देविदास गिरडे, कार्याध्यक्ष राजेंद्र तुमसरे, युवा संघटना अध्यक्ष सोमेश्वर पडगिलवार आदी उपस्थित होते. भोई समाजाचे आराद्य दैवत महर्षी वाल्मिकी देवस्थान उभारणी करण्याचे दृष्टीने जागेचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी वरोरा तालुका भोई समाज सेवा संघाची कार्यकारिणी गठित करण्यात आली. त्यामध्ये तालुका अध्यक्ष रंजना पारशिवे, उपाध्यक्ष रवी करलुके, कोषाध्यक्ष कवडू रुयारकर, सचिव गोपाळ कामतकर, तालुका संघटक बाळू रुयारकर आदींची निवड करण्यात आली. शहर कार्यकारणीत अध्यक्ष सुलभा शिवरकर, युवा अध्यक्ष आशिष रुयारकर आदींची निवड करण्यात आली आहे. प्रास्ताविक महेश पडगिलवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आशिष रुयारकर, सागर करलुके, मारोती करलुके, कार्तिक रुयारकर, हर्षद रुयारकर, संदीप करलुके, बाळू रुयारकर, तुमराम करलुके , तुळशिराम करलूके, मनोहर पारशिवे, मारोती कामतवार, गणपत रुयारकर आदींनी सहकार्य केले. संचालन राजेंद्र तुमसरे आणि आभार आशिष रुयारकर यांनी मानले (शहर प्रतिनिधी )