शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासकीय कार्यालयावर समाजकार्य विद्यार्थ्यांची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 00:02 IST

सरकारने काढलेल्या नव्या अध्यादेशानुसार समाजकार्य शिक्षणाच्या व्यतिरिक्त इतरही अभ्यासक्रमातील विद्यार्थी विविध भरतीसाठी पात्र आहेत.

ठळक मुद्देआक्रोश मोर्चा : उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

आॅनलाईन लोकमतचिमूर : सरकारने काढलेल्या नव्या अध्यादेशानुसार समाजकार्य शिक्षणाच्या व्यतिरिक्त इतरही अभ्यासक्रमातील विद्यार्थी विविध भरतीसाठी पात्र आहेत. या निर्णयाच्या विरोधात समाजकार्य विद्यार्थ्यांनी सन विद्यार्थी संघटनेच्यावतीने प्रशासकीय कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले.विविध विभागातील पदभरतीसंदर्भात सरकारने ३१ जुलैला नवा अध्यादेश पारीत केला. त्यानुसार समाजकार्य शिक्षणाच्या व्यतिरिक्त इतरही अभ्यासक्रमातील विद्यार्थी पदवीधारक आदिवासी, महिला व बालकल्याण, समाजकल्याण, आरोग्य कामगार विभागाच्या आदी पदभरतीसाठी पात्र आहेत. त्यामुळे समाजकार्य स्नातक व पारंगत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांत सरकार विरोधात असंतोष पसरला आहे. सरकारच्या अधिनस्त समाजकार्य शिक्षणाशी निगडीत असलेल्या विविध विभागातील पदभरतीसाठी समाजकार्य शिक्षणाची पात्रता कायम होती. तीच पात्रता पूर्ववत करण्याच्या दृष्टीकोनातून समाजकार्याच्या विद्यार्थ्यांनी ‘आपले भविष्य आपल्या हाती, लढा फक्त न्यायासाठी’ अशा घोषणा देत हुतात्मा स्मारक येथून सन विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष गणेश येरमे यांच्या नेतृत्वात प्रशासकीय विभागावर आक्रोश मोर्चा काढला. त्यानंतर उपविभागीय अधिकारी हरिश धार्मिक यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, समाजकल्याण मंत्री राजकुमार बढोले, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना आपल्या मागण्यांचे निवेदन पाठविले. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात आजी-माजी समाजकार्य अन्यायग्रस्त विद्यार्थी कृती समितीचे सचिव रोशन जुमडे, अमोल मोडक, गोकुल सिडाम, सोमेश्वर थुटे, राहुल, मडावी, अक्षय लांजेवार, शशिकांत चाटे, गिरीश बांगडे, प्राजक्ता टेंभूरकर, स्वप्नील मजगवळे, प्रतिक शेंडे, नागो टापरे, स्वप्निल भुसारी, उत्कर्ष मोटघरे, पूजा रामटेके, शितल पारधी, मेघा चाचरे, सपना शेंडे, अरविंद सालवटकर, पुनम खंडारे आदी उपस्थित होते.अनेक शाखांमधील पदवीधारकांचा आदिवासी विकास, सामाजिक समस्या, समाजकल्याण प्रशासन आदी विषयांबाबत कोणताही संबंध आलेला नसतो. त्यांच्यात आदिवासींच्या प्रश्नांबाबत संवेदनशीलता अभावानेच असते. अन्य पदवीधर विद्यार्थ्यांना आदिवासी समुदायांसोबत काम करण्याकरिता आवश्यक तंत्र, कौशल्यही नसते. त्यामुळे हा निर्णय रद्द करण्यात यावा.- गणेश येरमे, अध्यक्ष, सन विद्यार्थी संघटना, चिमूर