७५ जणांचे रक्तदान : लोकमतसह सामाजिक संघटनांचा संयुक्त उपक्रमचंद्रपूर : लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक-संपादक तथा स्वातंत्र्य संग्राम सेनानी स्व. जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीला सामाजिक उपक्रमाची किनार लाभली. सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून लोकमतने रक्तदान शिबिराचे आवाहन केले. या आवाहनात आयएमए आणि जिल्हा सामान्य रूग्णालयाचे पुढाकार घेतला. आणि ७५ रक्तदात्यांनी स्वयंस्फुर्तीने सहभाग दर्शवून रक्तदानाचे पवित्र कार्य पार पाडले.स्थानिक आयएमए सभागृहात हा उपक्रम गुरूवारी सकाळी ९ वाजता सुरू झाला. तत्पूर्वी बाबूजींच्या प्रतिमेपुढे दीपप्रज्वलन करून आदरांजली वाहण्यात आली. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर होते. तर, उद्घाटन माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या हस्ते पार पडले. अतिरिक्त कार्यकारी अधिकारी अंकुश केदार, आयएमएचे अध्यक्ष डॉ. अशोक भुक्ते, सचिव डॉ. प्रसाद पोटदुखे, जिल्हा रक्त संक्रमण अधिकारी डॉ. अनंत हजारे, लोकमत परिवारातील ज्येष्ठ सदस्य डॉ. अशोक बोथरा, लोकमतचे सहायक शाखा व्यवस्थापक प्रमुख विनोद बुले, जिल्हा प्रतिनिधी गोपालकृष्ण मांडवकर आदी मंचावर उपस्थित होते.यावेळी बोलताना नरेश पुगलिया यांनी बाबूजींच्जा जीवनकार्यावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, बाबूजीे उत्तम प्रशासक होते. १९७७-७८ च्या काळात धर्मनिरपेक्ष चळवळीला वाचा फोडण्यासाठी व गोरगरिबांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी ‘लोकमत’नावाचे छोटे रोप लावले. त्याचा आता वटवृक्ष झाला असून समस्यांना वाचा फोडण्याचे काम करीत आहे. जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनीही या उपक्रमाचे कौतूक केले. केवळ वृत्तपत्रीय भूमिका न बजवता हे सामाजिक उत्तरदायित्व जोपासत आहे. यामागे बाबूजींची प्रेरणा असल्याचे ते म्हणाले. यावेळी यावेळी डॉ. प्रसाद पोटदुखे, डॉ.मंगेश गुलवाडे, लोकमत चंद्रपूरचे सहायक शाखा व्यवस्थापक विनोद बुले, डॉ. मनीष मुंधडा यांच्यासह ७५ जणांनी रक्तदान केले. या उपक्रमात रोटरी क्लब, महाराष्ट्र स्टेट मेडिकल रिप्रेंझेटेटिव्ह असोसिएशन, पुरूषोत्तमदास बागला होमियोपॅथी कॉलेज, सरदार पटेल महाविद्यालय, जगतगुरू व्यायाम शाळा, इको प्रो संघटना आदी संस्था सहभागी झाल्या होत्या. प्रास्ताविक गोपालकृष्ण मांडवकर यांनी केले. संचालन डॉ. अनंत हजारे यांनी तर आभार डॉ. मनीष मुंधडा यांनी मानले. (प्रतिनिधी)बी. सी. रॉय यांनाही अभिवादनया समारंभादरम्यान डॉ. बी. सी. रॉय यांनाही अभिवादन करण्यात आले. पचिम बंगालचे मुख्यमंत्री असलेले भारतरत्न डॉ. बी. सी. रॉय यांच्या जयंतीनिमीत्त डॉक्टर्स डे सप्ताह आयएमए पाळत आहे. या उपक्रांतर्गत शहरातील वैद्यकीय क्षेत्रातील मंडळी रक्तदान शिबिरात सहभागी झाली होती.दैवलकर गुरूजींचा सत्कारया उपक्रमाचे औचित्य साधून ‘शिवाजी गुरूजी’ नावाने प्रख्यात असलेले योगशिक्षक ९८ वर्षीय मारोती रामाजी दैवलकर गुरूजी यांचाही शाल, श्रीफळ देऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. १ जुलैला त्यांचा वाढदिवस पार पडला. त्यानिमीत्त त्यांच्या सामाजिक कार्याची जाणिव ठेवून आयएमआय आणि लोकमतकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. विक्रमी रक्तदानया शिबिरात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सत्यनारायण तिवारी यांनी २१० व्यांदा रक्तदान करून सामाजिक उपक्रमाचा विक्रम नोंदविला. या निमीत्त त्यांचे रोपटे देवून स्वागत करण्यात आले. या सोबतच नगरसेवक संजय वैद्य यांनीही आजवर ८१ वेळा रक्तदान केले आहे. या वेळी केलेल्या रक्तदानाची ही ८२ वी वेळ होती.
बाबूजींच्या जयंतीला सामाजिक उत्तरादयित्वाची किनार
By admin | Updated: July 3, 2015 01:17 IST