शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

सामजिक बांधिलकी; कोरोना संकटात व्हॉट्सअप समुहाने पुरविले ऑक्सिजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 13:28 IST

corona, Chandrapur News चंद्रपूर जिल्ह्यातील श्रीकृष्ण व्हॉट्सअप समुहाने सुरू केलेल्या उपक्रमामुळे गंभीर व गरजु रूग्णांना ऑक्सिजन पुरविण्यात येणार आहे. समाज माध्यमांच्या योग्य वापर करणारे नागरिक पुढे आले तर यातून लोकोपयोगी चळवळ उभी राहू शकते.

ठळक मुद्दे कोणत्याही कारमध्ये ठेवतो सिलिंडर

राजू गेडाम ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मोबाईल व्हॉटसअ‍ॅपमुळे जग जवळ आले. काही व्यक्ती याचा वापर चांगल्याच कामासाठी करतात असे ठामपणे म्हणता येत नाही. चॅटींग, चिटिंग करण्यात वेळ घालण्याची शक्यताही असते. मात्र, सामाजिक बांधिलकी जोपासून कोरोना महामारीच्या काळात मदत करणारे विरळेच असतात. कोरोनामुळे ऑक्सिजन पातळी कमी होते, हे डॉक्टरांकडून कळताच शहरातील श्रीकृष्ण व्हॉटसअ‍ॅप समुहाच्या सदस्यांनी अवघ्या तासातच ७५ हजार रूपयांचा निधी गोळा केला. त्यातून ऑक्सिजन सिलिंडर व साहित्य विकत घेवून गुरूवारी स्थानिक गांधी चौकात नागरिकांना समर्पित केले.कोरोनाचा संसर्ग सुरू असल्याने ऑक्सिजनचा सर्वत्र तुटवडा निर्माण झाला. गंभीर रूग्णाला ऑक्सिजन मिळेल याची खात्री नाही. त्यामुळे श्रीकृष्ण व्हॉट्सअप ग्रुपचे अभियंता किशोर कापगते व सहकाऱ्यांनी शहरातील सर्वसामान्य नागरिकांसाठी ऑक्सिजन मशीन घेण्याची कल्पना मांडली. सर्वांनी हा उपक्रम उचलून धरला. सदस्यांनी श्रीकृष्ण समुहावर मदत करण्याचे संदेश व्हायरल केले. अवघ्या काही तासातच कुणी रोख तर कुणी गुगल पे वरून मदत केल्याने ७५ हजारांचा निधी जमा झाला. या रकमेतून ऑक्सिजन सिलिंडर घेण्याचा निर्णय घेतला. कोणत्याही कारमध्ये किंवा कुठल्याही ठिकाणी लावता येईल, अशा प्रकारचे ऑक्सिजन सिलिंडर विकत घेण्यात आले. श्रीकृष्ण समूहाच्या वर्धापन दिनी गुरूवारी ग्रुप सदस्य व सेवाभावी व्यावसायिक जीवन कोंतमवार, नगर परिषदेचे उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे यांच्या हस्ते महात्मा गांधी चौकात नागरिकांना समर्पित करण्यात आले.

रूग्णांना मिळणार जीवदानश्रीकृष्ण व्हॉट्सअप समुहाने सुरू केलेल्या उपक्रमामुळे गंभीर व गरजु रूग्णांना ऑक्सिजन पुरविण्यात येणार आहे. समाज माध्यमांच्या योग्य वापर करणारे नागरिक पुढे आले तर यातून लोकोपयोगी चळवळ उभी राहू शकते. कोरोनामुळे माणसे एकमेकांपासून दूर जावे नये, यासाठी अशा सेवाभावी व्यक्तींची गरज आहे. विनाकारण समाजात तेढ निर्माण करण्यापेक्षा जनकल्याण्याचे उपक्रम राबविले तर अनेकांचे जीव वाचवा येवू शकते, हे या ग्रुपने सिद्ध करून दाखवले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस