मूल: घोरपडीची शिकार केल्याप्रकरणी मूल येथील रहिवासी शशिकांत डोर्लीकर व सतीश झाडे यांना वनविभागाने अटक केली. त्यानंतर न्यायालयाने दोघांचीही जामिनावर सुटका केली. शशिकांत डोर्लीकर यांच्या काळीपिवळी चार चाकी गाडीत एका अज्ञात इसमाने घोरपड आणून टाकली व पळ काढला. शशिकांत डोर्लीकर हा सतीश झाडे याच्या मदतीने घोरपडीची विल्हेवाट लावत असताना गस्तीखक असलेल्या वनविभागाच्या पथकातील वनरक्षकांना ही बाब दिसली. त्यानंतर आरोपींना मूलचे क्षेत्र सहायक विनोद जांभुळे यांच्याकडे आणले. वनविभागाच्या नियमानुसार कारवाई करुन आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने जामीन मंजूर केला. (तालुका प्रतिनिधी)
घोरपडीची शिकार, दोघांना अटक
By admin | Updated: October 7, 2015 02:02 IST