घनश्याम नवघडे ल्ल नागभीडकंत्राटदाराच्या कमावू आणि ग्रामपंचायतीच्या अक्षम्य दुर्लक्ष्यामुळे तपाळ पाणी पुरवठा योजनेमध्ये दिवसेंदिवस गचाळपणा वाढत आहे. हा गचाळपणा एक दिवस नागरिकांच्या आरोग्याशी खेळू शकतो, असे ढळढळीत सत्य ग्रामपंचायत सदस्यांच्या तपाळ भेटीत उघडकीस आले आहे.गेल्या पंधरवड्यात जवळपास आठ दिवस तपाळ पाणीपुरवठा योजनेचा पाणी नागभीडकरांना मिळत नव्हता. ही समस्या कशामुळे निर्माण झाली याची माहिती घेण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य रमेश ठाकरे, विजय अमृतकर, विक्की भडकाम, गिरीधर अमृतकर यांनी तपाळला भेट दिली आणि संपूर्ण योजनेची पाहणी केली असता भयानक सत्य समोर आले.या पाहणीत पाणी फिल्टर करणारी यंत्रसामुग्री जंगाने मळलेली आढळून आली. शुद्धीकरण करणाऱ्या यंत्राची रेती गेल्या कित्येक वर्षापासून बदलविण्यात आली नाही, असे या चमूच्या लक्षात आले. आता या रेतीची माती बनली असे या सदस्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. या ठिकाणी पाण्याचा उपसा करणाऱ्या दोन मशीन (इंजिन) आहेत. पण एक इंजिन गेल्या तीन महिन्यापासून बंद असल्याचे या चमूला दिसले. समजा सुरू असलेल्या इंजीनमध्ये वेळेवर काही तांत्रिक बिघाड निर्माण झाला तर पाणी पुरवठ्याचा व्यवहारच बंद असतो. या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला ६ मे १९९५ ला प्रशासकीय मान्यता मिळाली आणि आॅगस्ट १९९९ ला कार्यान्वित करण्यात आली. नागभीडसह नवथळा चिखलपरसोडी, चिकमारा, देवटेक, बाळापूर, ढोरपा, मौशी, तारेगाव (बुज), तोरगाव (खुर्द) आणि तपाळ आदी ११ गावे या योजनेत समाविष्ट असून योजनेचे संचालन जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे आहे. पाणी पुरवठा व देखभालीसाठी जिल्हा परिषदेच्या या विभागाने एका कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे. पण या कंत्राटदारावर जिल्हा परिषदेच्या एकाही अधिकाऱ्याचे नियंत्रण नाही.
तपाळ योजनेचा ‘गचाळपणा’ उघडकीस
By admin | Updated: June 17, 2015 01:53 IST