चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. अनेकांना बेड मिळणेही कठीण झाले आहे. त्यातच ऑक्सिजन बेडसाठी तर रुग्णांच्या कुटुंबीयांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. रुग्णांनी न घाबरता आपली ऑक्सिजन लेवल वाढविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यामध्ये पालथे झोपणे हे रुग्णांसाठी तसेच निरोगी व्यक्तींसाठीही लाभदायी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
शहरी भागासह आता ग्रामीण भागातही कोरोनाचा उद्रेक झाला आहे. त्यामुळे प्रत्येक जण रुग्णालयात दाखल होण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, प्रत्येकालाच बेड मिळणे सध्यातरी कठीण आहे. अशावेळी ऑक्सिजन लेवल सुरळीत ठेवण्यासाठी घरच्या घरी उपाय करणेही महत्त्वाचे आहे. पालथे झोपल्याने श्वासोच्छवास क्रियेद्वारे काही टक्के प्राणवायू शरीरात जातो, त्यामुळे रुग्णांना अधिक दिलासा मिळत असल्याचे डाॅक्टरांचे म्हणणे आहे.
अनेक वेळा काहींना पाठीच्या बाजूने् किंवा डाव्या, उजव्या कुशीवर झोपण्याची सवय असते. मात्र, अगदीच कमी नागरिकांना पोटावर झोपण्याची सवय असते. पालथे झोपल्यानंतरही त्याचा शरीराला चांगला फायदा होतो. ऑक्सिजन कमी झालेल्या रुग्णांनी असे झोपल्यास ऑक्सिजन वाढ होत असल्याचेही डाॅक्टरांचे म्हणणे आहे.
-बाॅक्स
...तर पालथे झोपू नका
कोरोना काळात प्रत्येकाची चिंता वाढली आहे. त्यामुळे प्रत्येक जण आपली ऑक्सिजन क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र, गर्भवती महिला, गर्भपिशवीची नुकतीच शस्त्रक्रिया झालेल्या महिलांनी शक्यतो पालथे झोपू नये. गर्भपिशवीच्या शस्त्रक्रियेचा बराच कालावधी झाला असेल तर अशा महिलांनी पालथे झोपण्यास हरकत नाही. गर्भवती महिलांनी आपल्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी टिकवून ठेवण्यासाठी डाव्या, उजव्या कुशीवर झोपावे, पोटावर दाब येणार नाही याची काळजी घ्यावी.
बाॅक्स
असा वाढवा रक्तातील ऑक्सिजन
१. मनुष्य दर मिनिटाला साधारणत: १८ ते २० वेळा श्वास घेतो. तेव्हा तो ५ ते ७ टक्के ऑक्सिजन वापरतो. जेव्हा तो पालथा झोपतो, तेव्हा दर मिनिटाला एवढ्याच श्वासात ७ ते ८ टक्के ऑक्सिजन वापरतो.
२. सकाळी उपाशीपोटी पालथे झोपण्यास प्राधान्य दिल्यास अधिक लाभदायक ठरते. दुपारच्या जेवणानंतर डाव्या कुशीवर झोपावे, यामुळेही श्वसनास फायदा होतो. पालथे झोपताना अधूनमधून मानेची दिशा बदलावी. त्यामुळे मानेला त्रास होणार नाही.
३. नियमित चालणे हा सुद्धा उत्तम पर्याय आहे. नियमित व्यायाम करणेही आवश्यक आहे. अधिकाधिक वेळ लहान मुलांसोबत खेळण्यास प्राधान्य द्यावे, जेणेकरून त्यांच्यासोबत आपलाही चालणे, धावण्याचा व्यायाम होईल.
कोट
कोरोनामुळे रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांनी, गृहविलगीकरणात असलेल्या किंवा न्यूमोनिया झालेल्या रुग्णांनी दिवसातून किमान १५ ते १६ तास पोटावर झोपल्यास त्यांचा ऑक्सिजन वाढण्यासाठी फायदा होतो. अनेकवेळा आपण पाठीवर झोपतो. त्यामुळे फुप्फुसाचा अधिकाधिक भाग दाबला जातो. परिणामी ऑक्सिजन लेवल कमी होते. पालथे झोपण्यामुळे श्वसनक्रिया बळकट होण्यास मदत होते. यासोबतच फुप्फुसाचे काही व्यायाम आहेत. ते नियमित केल्यास फुप्फुस सक्षम होण्यास मदत होते.
बाॅक्स
हे आहेत फायदे
पालथे झोपल्यामुळे फुप्फुसाच्या शेवटपर्यंत हवा भरते आणि ऑक्सिजन पोहोचतो. लांब श्वास घ्यायचा. त्यामुळे छाती फुगेल. त्यानंतर हळूहळू श्वास सोडायचा आहे. पालथे ेझोपल्यामुळे हवा फुप्फुसाच्या शेवटपर्यंत जाते. त्यामुळे ही क्रिया ऑक्सिजन मिळवून देणारी ठरते. ऑक्सिजन पातळी ९४ च्या खाली गेलीच तर डाॅक्टरांशी संपर्क साधावा.
- डाॅ. अशोक वासलवार
हृदयरोग तज्ज्ञ, चंद्रपूर
कोट
-बाॅक्स
जिल्ह्यातील एकूण रुग्ण-
रुग्णालयात सध्या उपाचार घेत असलेले रुग्ण-
गृहविलगीकरणातील रुग्ण-