शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

वनविभागाच्या आंधळेपणाने ७२ सागवान झाडांची कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2017 00:46 IST

स्वत:च्या शेतातील धुऱ्यावरचे सागाचे एक झाड तोडायचे असले तरी शेतकऱ्यांना वनविभागाचे उंबरठे झिजवावे लागतात.

रेकॉर्डवर २५ झाडे : तरीही ७२ झाडांच्या कत्तलीची परवानगी दिली कशी ?चंद्रपूर : स्वत:च्या शेतातील धुऱ्यावरचे सागाचे एक झाड तोडायचे असले तरी शेतकऱ्यांना वनविभागाचे उंबरठे झिजवावे लागतात. वर्ष निघून जावूनही परवानगी मिळत नाही. कुणी स्वत:हून झाड तोडलेच तर वन अधिनियमानुसार तो गुन्हा ठरतो. असे असताना चिमूर तालुक्यातील चिचघाट येथील शेतशिवारातून चक्क ७२ सागाची झाडे वन अधिकाऱ्यांच्या परवानगीनेच तोडण्याचा प्रकार घडला आहे. विशेष म्हणज, शेतात केवळ २५ झाडे असताना कागदावर ७२ झाडे दाखवून लगतच्या शेतातील झाडे तोडण्यात आल्याने हे प्रकरण गंभीर ठरले आहे.या संदर्भात सिद्धार्थ शंकर ढेकले या शेतकऱ्याने वनाधिकाऱ्यांकडे तक्रार केली असली तरी अद्याप कसलीही दखल घेण्यात आलेली नाही. यामुळे हा कसला कायदा, असा प्रश्न या व्यथीत शेतकऱ्याने उपस्थित केला आहे.चिचघाट यीथील शेतशिवारात सर्व्हे क्रमांक २५ मध्ये सिद्धार्थ ढेकले यांची १.४८ हेक्टर शेतजमीन आहेत. त्यांच्या शेतात ५० ते ६० वर्षे जुनी सागाची झाडे असल्याची नोंद खातेपुस्तिकेवर आणि सात-बारावर आहे. सुमारे ४.५ घनमिटर लाकूड असलेल्या या झाडांची किंमत बाजारभावानुसार दीड ते पाऊणेदोन लाख रूपये आहे. त्यांच्या शेतातलगतच टुमदेव श्रीहरी बारेकर यांचे सर्व्हे क्रमांक २६ हे शेत आहे. त्यांच्या शेतात असलेली झाडे तोडण्यासाठी त्यांनी वनविभागाकडे परवानगी मागीतली होते. मात्र योग्य सिमांकन न करता सिद्धार्थ ढेकले यांचया शेतातील झाडांसह लगतच्या शेतातील अशी ७२ झाडे १२ ते १३ जानेवारीला तोडण्यात आली. या दरम्यान सिद्धार्थ ढेकले बाहेरगावी होते. दोन दिवसांनी गावात परतले असता आपल्या शेतातील झाडे तोडून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले. यावर त्यांनी वनपरिक्षेत्राधिकारी चिवंडे यांच्याकडे विचारणा केली असता वनविभागाच्या परवानगीने झाडे कापली असे सांगण्यात आले. आपण परवानगी मागितली नसतानाही झाडे का तोडली, यावर मात्र ते समाधान करू शकले नाही. आपणास न्याय मिळावा यासाठी सिद्धार्थ ढेकले यांनी चिमूर एसडीओंकडे तक्रार केली. त्यांनी शेगावच्या ठाणेदारांना चौकशीचे आदेश दिले. या चौकशीतही अतिरिक्त झाडे कापल्याचे निदर्शनास आले आहे. (जिल्हा प्रतिनिधी) विनापरवानगीने झाडे तोडली, त्याचे काय ? -ढेकले आपले शेत बोरकर यांच्या शेतालगत आहे. त्यांच्या शेतातील झाडे तोडण्यावर आपला आक्षेप नाही. मात्र आपल्या शेतातील झाडे तोडण्याबाबत आपण अर्ज केला नसतानाही ती गुपचूप तोडण्यात आली. त्या झाडांची सात-बारावर नोंद आहे. ही झाडे तोडून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपले प्रचंड नुकसान केले आहे, त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न सिद्धार्थ ढेकले यांनी उपस्थित केला आहे. चुकीचे सिमांकन करून परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. आक्षेप नसल्यानेपरवानगी दिली-चिवंडेया संदर्भात वनपरिक्षेत्राधिकारी चिवंडे यांच्याशी संपर्क साधला असता, टुमदेव बोरकर यांना झाडे तोडण्याची परवानगी देण्यापूर्वी आपण जाहिरनामा काढला होता. सिद्धार्थ ढेकले यांचे शेत लागूनच आहे. त्यांचा आक्षेप नव्हता. त्यामुळे कुणाचाही आक्षेप नसल्याने परवानगी दिली, असे मोघम उत्तर वनपरिक्षेत्राधिकारी चिवंडे यांनी दिले आहे. अद्याप लाकडे रवाना झालेली नाहीत. ढेकले यांना त्यांच्या मालकीची लाकडे देता येतील, अशीही सावरासावर त्यांनी केली.