शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
Lufthansa Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
3
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
5
माकडाच्या हाती लागलं नोटांचं बंडल, झाडावर चढून केली ५००-५०० रुपयांच्या नोटांची उधळण, व्हिडीओ व्हायरल
6
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?
7
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
8
Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!
9
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
10
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
11
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
12
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
13
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
14
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
15
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
16
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
17
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
18
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
19
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
20
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?

स्केटींगच्या चिमुकल्या बादशहाची आईला अनोखी श्रद्धांजली, तिच्या तेरवीलाच मिळवला खिताब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 18:13 IST

तेरवीच्या दिवशी पुणे येथे आयोजित वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया या मॉस खिताबचा भागीदार बनून आपल्या आईला अनोखी श्रद्धांजली अर्पण केली.

राजेश भोजेकरचंद्रपूर : सुख जवाएवढे आणि दु:ख पर्वताएवढे ही म्हण येथील साडेसहा वर्षीय स्केटींगच्या बादशहाने खोटी ठरवली. बालपणीच स्केटींगमध्ये विविध विक्रमांची नोंद आपल्या नावे करणाऱ्या शिशिर उर्फ धृव सुभाष कामडी या चिमुकल्याने आपल्या आईच्या निधनाचे दु:ख बाजुला ठेवून तिच्या तेरवीच्या दिवशी पुणे येथे आयोजित वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया या मॉस खिताबचा भागीदार बनून आपल्या आईला अनोखी श्रद्धांजली अर्पण केली.हा खिताब पटकावल्यापासून त्याला आपल्या आईची आठवण आणखी प्रकर्षाने जाणवू लागली आहे. तो सोमवारी चंद्रपुरात परतला तेव्हा आता आपली आई नेहमीसारखे कौतुक करायला नाही.  ही गोष्टच त्याच्या मनाला न पटणारी झाली आहे.

धृवच्या नावावर लिंबो स्केटींगमध्ये गिनिज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड, गोल्डन बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड व इंडियन अ‍ॅचिव्हर बुक आॅफ रेकॉर्ड, स्पिड स्केटींगमध्ये आशिया बुक आॅफ रेकॉर्ड व इंडिया बुक आॅफ रेकॉर्ड या नोंदी आहे. १५ आॅगस्ट २०१५ रोजी सेवाग्राम ते वर्धा स्वराज यात्रा स्केटींग रॅलीमध्ये सहभाग नोंदविला. २६ जानेवारी २०१७ रोजी उमरेड जि. नागपूर येथे सलग सात तास स्केटींग केली. तसेच स्केटींगच्या विविध स्पर्धांमध्ये भाग घेत आतापर्यंत त्याने २० गोल्ड, सहा रजत आणि दोन ब्रॉस पदक पटकावले आहे.

स्कॅटेलान अ‍ॅन्ड वेवबोर्ड स्पोर्टस् महाराष्ट्र असोसिएशनच्यावतीने पुणे येथील महाराष्ट्र मंडळ स्पोर्टस अ‍ॅन्ड एज्युकेशन कॉम्प्लेक्स येथे स्टुडंट परफार्मस रोलर स्केटींग इन कपल अंतर्गत वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाचे पहिल्यांदाच आयोजन २० आॅगस्ट रोजी करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये धृवने सहभागी व्हावे, यासाठी त्याची आई शिल्पा हिने ३० जुलै रोजी त्याचा सहभागी फार्म भरून दिला. मात्र नियतीला काही वेगळेच हवे होते. या स्पर्धेची तयारी सुरू होती. स्पर्धा जवळ आली असताना ८ आॅगस्ट रोजी धृवची आई शिल्पा हिने अचानक जगाचा निरोप घेतला. आईच्या एकाएकी निघून जाण्याने धृव पूरता खचला. मात्र या स्पर्धेसाठी खुद्द आईनेच आग्रह धरला असल्याची आठवण त्याला झाली. हीच आईला खरी श्रद्धांजली ठरेल. २० आॅगस्ट रोजी ही स्पर्धा होती आणि त्याचदिवशी त्याच्या आईची तेरवीसुद्धा होती. या स्केटींगच्या चिमुकल्या बादशहाने दु:ख बाजुला सारून या स्पर्धेत सहभाग नोंदविला. आणि या अनोख्या विक्रामाचा तो भागीदार ठरला. ही भागीदारी आपल्या आईला खरी श्रद्धांजली असल्याचे धृवने ह्यलोकमतह्णशी बोलताना सांगितले. मी मोठे व्हावे, ही आईची इच्छा होती. तिच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याचा संकल्प केला असल्याचे सांगताना त्याच्या डोळ्यात अश्रू तरंगत होते.