शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

ताडोबातील सहा वाघ गुजरात व नागझिऱ्यात पाठविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2023 08:10 IST

Chandrapur News ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढल्याने काही वाघांचे अन्य व्याघ्र प्रकल्पात स्थलांतरण करण्याच्या हालचाली वनविभागाने सुरू केल्या आहेत. यातील सुमारे सहा वाघ गुजरात व नागझिरा प्रकल्पात पाठविण्यात येणार आहेत.

राजकुमार चुनारकर

चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढल्याने काही वाघांचे अन्य व्याघ्र प्रकल्पात स्थलांतरण करण्याच्या हालचाली वनविभागाने सुरू केल्या आहेत. यातील सुमारे सहा वाघ गुजरात व नागझिरा प्रकल्पात पाठविण्यात येणार असून, त्यादृष्टीने झरणी वाघिणीच्या पोक्त झालेल्या मादी बछड्याला खडसंगी बफर झोन क्षेत्रातील नवेगाव परिसरात जेरबंद करण्याची माेहीम हाती घेतल्याची माहिती सूत्राने दिली.

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प वाघांच्या प्रजननासाठी उत्तम असल्याने मागील काही वर्षांपासून वाघांची संख्या वाढतच आहे. वाढत्या वाघांच्या संख्येने ताडोबातील जंगल कमी पडू लागले आहे. त्यामुळे मानव वन्यजीव संघर्ष वाढत आहे यावर उपाय म्हणून वनविभाग येथील वाघांचे स्थलांतर इतर क्षेत्रात करीत आहे. ब्रह्मपुरी विभागातून सहा वाघांचे स्थलांतरण नागझिरा व गुजरात येथे करण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यादृष्टीने खडसंगी बफरझोन क्षेत्रातील नवेगाव गेट व भुयार देव परिसरात पर्यटकांची आवडती असलेल्या झरणी वाघिणीच्या बछड्याला जेरबंद करण्याची मोहीम वनविभागाने सुरू केली आहे. मात्र, ताडोबा व्यवस्थापनाने याबाबत कमालीची गुप्तता पाळली आहे.

टॅग्स :Tadoba Andhari Tiger Projectताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पTigerवाघ