लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील वर्षी होळी सणानिमित्त महिलांना साडी वाटप केली जाणार होती; परंतु लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत साडी वाटपाचा कार्यक्रम अडकला होता. निवडणुकीनंतर टप्प्याटप्याने साडी वाटप करण्यात आली होती. यावर्षीसुद्धा होळी सणानिमित्त साडी वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी पुरवठा विभागाकडून नियोजन करणे सुरू केल्याची माहिती मिळाली दारिद्रयरेषेखालील आहे. विशेषतः अंत्योदय कार्डधारकांना साड्यांचा लाभमिळणार असल्याची माहिती मिळाली आहे.
महिलांना प्रतिक्षामागील वर्षीपासून अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना मोफत साडी देखील दिली जात आहे. यावर्षी लवकर साड्या वाटपाची प्रतीक्षा महिला लाभार्थ्यांना सध्यातरी आहे.
'आनंदाचा शिधा'ने सणात गोडवास्वस्त धान्याचा लाभ घेणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना चैत्र पाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गौरी-गणपती आणि दिवाळी सणानिमित्त स्वस्त धान्य 'आनंदाचा शिधा' वाटप केला जातो.
अंत्योदय कार्डधारकजिल्ह्यात १ लाख ४२ हजार ८७३ अंत्योदय कार्डधारक आहे. या कार्डधारकांना स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून साडी वितरित केली जाणार आहे.
प्राधान्य कुटुंबांनाही द्यावी साडीहोळी सणानिमित्त केवळ अंत्योदय कार्डधारकांना प्रत्येकी एक साडी मोफत दिली जाणार आहे. धान्य व आनंदाच्या शिधासाठी पात्र असलेले प्राधान्य कुटुंब कार्डधारक मोफत साडीच्या लाभापासून वंचित राहावे लागते. त्यांनी सरकारचे काय घोडे मारले, असा प्रश्न लाभार्थी विचारत आहेत.